दि हातमाग विणकर बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्यादित हिंगणघाट येथे नविन संचालकांची निवड

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगनघाट :- विदर्भातील सर्वात जुनी व नामांकीत अशी दि हातमाग विणकर बहुउद्देशिय सहकारी संस्था मर्यादित हिंगणघाटची पंचवार्षीक निवडणुक शुक्रवार, दि. ३० डिसेंबर २०२२ ला संस्था कार्यालयात अविरोध पार पडली.

यात नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून अध्यक्षपदी श्री. रमेशराव सिर्सीकर, उपाध्याक्षपदी सौ. सविता शशिकांत बोकडे, तर श्री. प्रमोद कृष्णाजी कुंभारे यांची सचिव पदी एक मताने अविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ म्हणुन निवड झालेले श्री अशोक सोरटे गुरुजी, श्री केशवराव कुंभारे, श्री विठृठलराव डेकाटे, श्री भाष्‍करराव बाकडे, श्री रमेशराव शिर्शीकर, श्री प्रमोदराव कुंभारे, श्री प्रविण निनावे, श्री संतोष डेकाटे, श्री संदेश डेकाट, सौ. सविताताई बोकडे, सौ.सुनिताताई कुंभारे हे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या सभेत उपस्थितापैकी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. विठृठलराव डेकाटे व सचिव श्री भाष्‍करराव बाकडे यांनी संस्थेच्या मागील यशस्वी वाटचालीची माहीती देत मागील ५ वर्षात घडलेल्या घडामोडीवर प्रकाश टाकला.

संस्थेचे जेष्ठ संचालक श्री अशोक सोरटे गुरुजी व श्री केशवराव कुंभारे यांनी उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले.

निवडणुक यशस्वी पार पाडण्यात निवडणुक अद्यासी अधिकारी म्हणुन श्री. शैलेश कोपुलवार, श्री वासनिक व संस्थेचे व्यवस्थापक श्री गजाजनराव डेकाटे यांचे मोलाचे योगदान लाभले तर संस्थेचे जेष्ठ संचालक व सभासद श्री. गुलाबराव वैरागडे, श्री. आनंदराव निनावे, श्री. शशीकांत बोकडे, श्री.कमलाकर हवाईकर, श्री. मोरेश्वर कुंभारे, श्री. वासुदेवराव डफाडे यांचे उपसिथतीत खेळीमळीच्या वातावरणात नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पुढील कारकीर्दी करीता शुभेच्छा देउन कार्यक्रम आनंदात पार पडला.

Leave a Comment