दिव्यांग याचे पाच वर्षांपासून ग्रामपंचायत कडून निधी वाटप न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वतीने मोताळा तहसीलदार यांनां निवेदन 

 

बुलडाणा जिल्ह्य़ातील येत असलेल्या मोताळा तहसीलदार यांना अविनाश वाकोडे यांनी दिले निवेदन. मोताळा तहसील हद्दीत येत असलेल्या गावांमध्ये दिव्यांग यांचे ग्रामपंचायत मध्ये जे निधी येते ते मागील पाच वर्षापासून वाटप करण्यात आली.

नसुन दिव्यांग ची ती निधी लवकरात लवकर देण्यात यावी. तसेच चार ते पाच महिन्यांपासूनअर्थसाहाय्य योजनेच्या केसेस प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर मागी काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. श्रावण बाळ, विधवा महिलेचे जे केसेस प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे.

अशा मागणीचे निवेदन मोताळा तहसीलदार साहेब यांना देण्यात आले. सदर निवेदन देताना उपस्थित म्हणून बुलढाणा जिल्हाचे सरचिटणीस अपंग दिव्यांग सेल अविनाश वाकोडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच दिव्यांग मोठ्या संख्येन्ये उपस्थित होते

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

Leave a Comment