दबंग ठाणेदार विलास पाटील यांनी शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर मारला छापा

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विलास पाटील यांनी शहराच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून हजारो रुपये नगदी व साहित्य जप्त केले

या कारवाईमुळे जुगार यामध्ये खळबळ निर्माण झालेली दिसत आहे शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार विलास पाटील यांना गुप्त माहिती मिळाली

की शहरातील इदगाह प्लॉट आणि आठवडी बाजार इत्यादी भागामध्ये पैशाच्या हारर्जित वर वरली मटका व जुगार सुरू आहे या मिळालेल्या माहितीवरून ठाणेदार विलास पाटील यांनी शेगाव शहर येथील पो.ना. वाकेकर व इतर पो.स्टाप सह ईदगाह प्लॉटमध्ये छापा मारून त्या ठिकाणी एकाबादशाह नावाचा ताशपत्ता जुगार खेळणारे

आरोपी 1) फिरोज खान करीम खान वय 49 वर्ष

आरोपी 2) शेख अकिल शेख नजिर वय 38 वर्षे

आरोपी 3) शेख रूस्तम ऊर्फ सदाम शेख बशिर वय 29 वर्षे सर्व रा. इदमहाप्लॉट शेगाव
यांचेवर कलम 12 (अ) म.जु.का. अंतर्गत 19:30 वा सुमारास छापा कार्यवाही करून

त्याचे अंगझडतीत व डावावर , 3 मोबाईल नगदी पैसे व 52 ताशपत्ते असा एकूण 35,050/- रू चा मुद्देमाल घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे जप्त करून कलम 12 (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचा पुढील पो.हे.का. वाघमारे करीत आहे.

तसेच आज दिनांक 19.06.2023 रोजी आठवडी बाजार परिसरामध्ये पोहे का गजानन प्रल्हाद वाघमारे यांनी छापा मारून वरली मटका जुगार खेळ पैशांची हार जीत वर खेळणारा आरोपी शेख इरफान शेख मंजूर व 27 वर्ष राहणार आझाद नगर आळस नारोड आरोपी तुला ताब्यात घेऊन

त्यांच्या जवळून एक मोबाईल नगदी पैसे असा एकूण 16.255 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कलम 12 मुजूका प्रमाणे गुन्हा दाखल केला गुन्ह्यांची पुढीलतपास पो. ना गणेश वाकेकर करीत आहे

Leave a Comment