गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत येथे वार्ड6 नंबर सहा मध्ये नाल्या गेल्या कित्येक दिवसांपासून साफ केलेल्या नाहीत व ग्रामपंचायत सफाई कामगार सुद्धा वार्ड नंबर 6 मधील सुनील खवले यांच्या घरासमोरील नाल्या साफ करीत नाही त्या नाल्या ब्लॉक होऊन त्यामधील केरकचरा घाण रोडवर येत आहे व त्या घाणीमुळे नागरिकांना रस्त्यावर चालतासुद्धा येत नाही व त्या घाणीचा दुर्गंध परिसरात पसरून परिणामी सदर गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी या संबंधित बाबीचा ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी वार्ड नंबर सहा मधील नागरिकांनी केली आहे ही बातमी प्रसारित होताच ग्रामपंचायत प्रशासन जागे होऊन वॉर्ड न 6 मध्ये सफाई कामगारांकडून साफ सफाईचे काम सुरू केले