चिखलीः उत्तर प्रदेश येथील हाथरस,(युपी) येथील दलीत मुलीवर झालेल्या अन्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणे बाबत. नम्र निवेदन सादर देण्यात आले. निवेदनात नमुद उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत तरुणीवर अमानुष अन्याय अत्याचार करुन निघृण हत्या करण्यात आली व तिचे प्रेत सुध्दा तिच्या घरच्यांना देण्यात आले नाही. उलट स्थानिक प्रशासन हे उडवाउडवीचे उत्तरे देऊन दिशाभुल करीत आहे त्या निषेधार्थ चिखली शहर व तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व समस्त अनुसुचीत जाती जमातीच्या (दलीत) नागरीकांच्या वतीने दि. 5 आक्टों 2020 दुपारी 12.00 वाजता फुले आंबेडकर वाटीके पासुन सिमेंट रोड ने बैल जोडी समोरुन बागवान गल्ली तसेच नगर परीषद समोरुन मा. तहसिलदार साहेब यांच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जास्तित जास्त संखेने उपस्थीत राहण्याचे व सर्वांनी तोंडाला मास लाऊन व सामाजिक अंतर ठेऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहण करण्यात आले आहे.
यावेळी प्रशांतभैया डोंगरदिवे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मानवाधिकार संघटन, भाई सिध्दार्थ पैठणे जिल्हा अध्यक्ष स्वारीप, किशोर कदम काॅग्रेस नेते, भाई विजय गवई दलीत मुक्ती सेना, प्रा. राजु गवई नगरसेवक, हिम्मत जाधव आरपीआय, प्रशांत ढोरे पाटील विदर्भ प्रदेश अध्यक्ष रयतक्रांती संघटना, आनंद गैची प्रदेश अध्यक्ष यूवा वाल्मीकी समाज, अनिल वाकोडे शेतकरी संघटना, विजय खरे, विजय नकवाल नगर सेवक, मनिष मोरे सामाजीक कार्यकर्ते, समाधान भटकर, नंदु कर्हाडे यूवा सेना, प्रितम गैची शिवसेना, प्रकाश बनकर, बाळु भिसे वंचीत आघाडी, भाई विजयकांत गवई, विजय सोनवाल, रवि मगर बामसेफ, सुरज अवसरमोल बसपा, विनोद कळसकर वंचीत नेते गजानन पवार शिवसेना, नितीन फुलझाडे संपादक वृत्त धर्म, छोटु कांबळे संपादक आम्हीचिखलीकर, विनोद खरे पत्रकार सकाळ, रविंद्र वानखडे हे उपस्थित होते.