प्रतिनिधी:(जालना)जाफराबाद तालुक्यातील डोणगाव परिसरामध्ये यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दि.२४/०१/२०२३ रोजी मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अवकाळी वाऱ्यासह पावसाने पिकांचे वाजले तीन तेरा सविस्तर वृत्त अशी की यंदा खरीप हंगामातील पिकांचे नैसर्गिक नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना हिरवी पेंडी दिली का असा प्रश्न शेतकऱ्यासमोर दिसून येत.
असून त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत असून असा प्रश्न जानकर शेतकरी सांगत असून त्यामध्ये कापूस सोयाबीन मका तुर भाजीपाला सह मोठे नुकसान झाले होते.
त्यानंतर शेतकऱ्याने कशीबशी कंबर कसून मोठ्या आशेने रब्बीची तयारी करण्यात आली होती मंगळवारी रात्रीच्या वेळी पावसाने वाऱ्याने धुमाकूळ घातल्यामुळे गहू ज्वारीच हरभरा बाजरी मका कापूस द्राक्ष डाळिंब भाजीपाला अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी जोर धरत असून.
शेतकऱ्यांचे आलेले तोंडाचे घास नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,नुकसान झाले होते पण शेतकऱ्यांनी डबल कंबर कसून मशागत करून पेरण्याची बी बियाणे रासायनिक खते पैशाची उसनवारी करून मोठे प्रमाण होते.पिकांची मोठी
अगोदर खरीप पिकांचे नुकसान झाले असून त्यामध्ये कापूस मका सोयाबीन आधी पिकांची मोठी नुकसान झाले होते.
पिकांची ही जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड व पेरणी करण्यात आली होती बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस उपटणे करून रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होण्याकरिता व आर्थिक मदत या आशेने खर्च करण्यात आले होते. वाऱ्यासह पावसाने पिकामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केली असून शेतकरी संकटाला तोंड देत असून अशी चर्चा जाणकार शेतकरी करत आहे.
डोणगाव,निवडुंगा,पोखरी,बुटखेडा,शिराळा,देळेगव्हाण,गाडेगव्हाण,सातेफळ,इस्लाम वाडी,आसरखेडा,आदी गावांची शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या आपत्ती संकटामुळे डोळ्यात पाणी आले आहे.
प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना