डोंगर कठोर येथे भालोद प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनावर मार्गदर्शन

 

 

(यावल प्रतिनीधी) विकी वानखेडे

आज दिनांक 23/2/21रोजी डोंगर कठोरा येथे भालोद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गतडोंगर कठोरा उपकेंद्रा चे मेडिकल ऑफिसर डॉ श्री हर्षल चौधरी यांनी कोरोना कोविड 19 हा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत कार्यालयात येथे सर्व सदस्य सरपंच उप सरपंच पोलीस पाटील यांना कोरोना संदर्भात माहिती दिली व कोरोनाचे लक्षण कसे ओळखले जातात त्या बद्दल माहिती दिली ते पुढे म्हणाले की मागील कोरोना पेक्षा हा आता वाढता कोरोना खूपच भयंकर आहे त्या साठी आपण आपल्या गावातील ग्रामस्थांची कश्या प्रकारे काळजी घ्यायची आहे ते समजावून सांगितले व सदस्य डॉ श्री आर सी झाबरे यांनी सुद्धा कोरोना पासून कसा बचाव करावा ही माहिती दिली ते पुढे म्हणाले मी माझ्या हॉस्पिटल मध्ये मोफत टेम्परेचर व ऑक्षिमिटर ने सर्व गाव कऱ्यांची मोफत तपासणी करीत आहे ज्यांना काही लक्षण असतील त्यांनी माझ्या हॉस्पिटल ला येऊन मोफत तपासणी करून घ्यावे व तसे काही आढळ्यास पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर ला रेफर करून ट्रीटमेंट करावी व आपली व परिवाराची काळजी घ्यावी व गावातील ग्रामस्थ यांनी मास्क न वापरल्यास प्रत्येकी 50 रुपये दंड वसुल करून मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करू असे ते बोलत होते नवनिर्वाचित सदस्य दिलीप तायडे जुम्मा तडवी यांनी सुद्धा कोरोना संदर्भात व गावात कश्या प्रकारे सुरक्षितात राहील या बद्दल माहिती मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले कि आपले गाव आपली जबाबदारी म्हणून ग्रामविकास अधिकारी यांचा सल्ला घेऊन पुढील गावात कोरोना संदर्भात जनजागृती करावी असे सांगितले व बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची बस स्टॉप वर ओक्षिमीटर ने व टेम्परेचर घेऊन च गावात प्रवेश द्यावा व रात्री बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करावी असे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाला सर्व नवनिर्वाचित सरपंच श्री नवाज तडवी, उप सरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी आर सी पवार सदस्य श्री दिलीप तायडे,मनोहर झाबरे, डॉ आर सि झाबरे, जुम्मा तडवी, कल्पना राणे,कल्पना पाटील, शबनम तडवी, शकीला तडवी, हेमलता जावळे, एश्वर्या कोलते, आशा आढाळे, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, क्लर्क प्रदीप पाटील, शिपाई खेमचंद्र पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी सोमा कोल्हे,उपकेंद्राचे कर्मचारी डॉ हर्षल चौधरी, आरोग्य सहाय्यक चेतन कुरकुरे, श्रीमती एल व्ही चौधरी,आदींची उपस्थिती होती

Leave a Comment