डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे हजारो नागरिकांनी घेतले दर्शन

 

अमरावती:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिन रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे मित्र परिवारातर्फे अमरावती शहरातील जनतेच्या दर्शनासाठी वटफळी येथून भंतेजी सुमित बोधी महाथेरो व भन्तेजी प्रज्ञा बोधि महाथेरो आणि भिकू संघाच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश सर्वप्रथम बुद्ध टेकडी 500 क्वार्टर या ठिकाणी आले.

व त्या ठिकाणी हजारो नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले तेथून ही असती कलश वडाळी येथील जनतेच्या दर्शनासाठी प्रत्येक विहारात घेण्यात आले व दुपारी एक वाजता ही असती कलश बडनेर येथील समता चौक या ठिकाणी देण्यात आले या ठिकाणी सुद्धा हजारो नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन पुण्यानुमोदन केले.

बडनेर येथे मनोज भाऊ गजबे उमेश भाऊ मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सायंकाळी सहा वाजता अस्थि कलश भीम टेकडी या ठिकाणी आले व या ठिकाणी सुद्धा हजारो नागरिकांनी दर्शन घेतले व सायंकाळी साडेसात वाजता हे अस्थि कलश वटफळी या ठिकाणी रवाना झाले.

या अभिवादन कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बुद्ध टेकडी मित्र मंडळ वडाळी येथील संपूर्ण नागरिक बडनेरा येथील संपूर्ण नागरिक व प्रभाग क्रमांक 27 संजय गांधी नगर उत्तम नगर पंचशील नगर कैलास नगर बेनोडा महादेव खोरी शांतीनगर जेवण नगर येथील हजारो नागरिकांनी रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी कलश अमरावती शहरातील जनतेच्या दर्शनासाठी आणण्यासाठी मदत केली.

Leave a Comment