डोणगावमध्ये आंदोलनाची पहिली ठिणगी..
पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले. या विधेयकांना देशातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते मा.राजू शेट्टी व मा.व्ही.एम.सिंग यांनी दि.25 सप्टेंबर रोजी देशभर या विधेयकांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात डोणगावमध्ये पडली आहे.
‘स्वाभिमानी’चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वाखाली आज (ता.25 सप्टेंबर) बुलडाणा जिल्ह्यातील नागपूर औरंगाबाद रोडवरील डोणगाव ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या तिन्हीही बिलांची होळी करून या विधेयकांना जोरदार विरोध करण्यात आला. ही कृषी विधेयके आणून केंद्र सरकार हमीभावाच्या कायद्यातुन पळ काढीत आहे. शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्याच्या दारात उभे करीत आहे.असा आरोप डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांनी केला. तसेच प्रथम शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून घ्या आणि मग त्याला जगाच्या स्पर्धेत उतरवा..शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारात उभे करणाऱ्या केंद्र सरकारला याची किंमत चुकवावी लागेल….! असा इशारा त्यांनी यावेळी दिला..
यावेळी ‘स्वाभिमानी’चे पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल,वि.आघाडीचे ता.अ.अमोल धोटे,निलेश सदावर्ते,गौतम सदावर्ते, यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..