बोरगाव बु!! येथे खाजगी टँकरने पाणीपुरवठा..
धरण उष्याशी पण कोरड घश्याशी अशी झाली अवस्था…
जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बु येथील गाव पाणीपुरवठ्याची विहीर पाण्याने अगदी भरलेली असून सुद्धा गावाला पाणी मिळत नाही.आणि या प्रश्नाने गावकरी बऱ्याच दिवसापासून हतबल झाले आहेत. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी केली असून देखील गावाला पाणी मिळत नसल्याची खंत गावकरी व्यक्त करीत आहेत.
गावच्या पाणी पुरवठा विहिरीत मोठा पाणी साठा असून गावाला पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे आणि हे केवळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे होत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.कधी पाणी पुरवठ्याची टाकी भरली जात नाही,तर कधी पाईप लाईन तुटली तर कधी टाकी भरण्यासाठी वीज नव्हती अशी एक ना अनेक कारणे ग्रामपंचायत तयार ठेवत असते आणि या मध्ये सर्वात जास्त धावपळ ती गावकऱ्यांची होत आहे.अश्यात गावकऱ्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती परंतु त्याचाही काही फायदा गावाला झाला नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
तसेच गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत वॉटर फिल्टर देखील बसविण्यात आलेले आहे परंतु गेले कित्येक दिवस कित्येक महिने झालेत परंतु त्या फिल्टर ला देखील पाणी येत नाही त्यासाठी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.आणि विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात या गावाला धामना नदीच्या पाण्याने वेढा देऊन पाणी अक्षरशः गावात घुसले होते गावाला अगदी मे ते जून महिन्यापर्यंत सुद्धा कधीच पाण्याची टंचाई येत नाही. पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाणी देखील भरपूर आसून केवळ चुकीच्या नियोजनामुळे किंव्हा हलगर्जी पणामुळे गावाला पाणी मिळत नाही म्हणजे धरण उष्याशी आणि कोरड घाष्याशी अशी आमची अवस्था झाली आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु बोरगाव येथे आताच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली त्यामध्ये पूजा प्रमोद फदाट हे निवडून आले आणि त्यांनी स्वतः हा स्व खर्चाने ट्रॅकर भाड्याने लाऊन स्वतःच्या विहिरीवरून टँकर भरून आणून गावाला पाणी पुरवठा करत आहेत. आणि आता तरी योग्य नियोजन करून गावाला नियमित पाणी पुरवठा करावा अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.