झुणका भाकर खाऊन आघाडी सरकारचा निषेध

 

अजहर पठाण
परभणी

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळी तोंडावर आलेली असतांना देखील शासनाने शेतकऱ्यांना अजूनही मदत दिलेली नाही. जी अल्प मदत जाहीर झाली त्यात सुद्धा भेदभाव केल्या गेला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या कमी दाखवून बहुसंख्य शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. महाराष्ट्रातील तिघाडी सरकारने शेतकरी बांधवांप्रति दाखवलेल्या उदासिन धोरणाचा निषेध करण्यासाठी आज रोजी..

जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जिल्ह्याच्या नेत्या कार्यक्षम आमदार सौ.मेघनादिदि साकोरे-बोर्ङीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा-किसान मोर्चा परभणी च्या वतीने ‘चुन भाकर आंदोलन’ करून शेतकऱ्यांप्रति उदासीन असलेल्या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला व मा.जिल्हाधिकारी साहेब यांना झुनका-भाकर देऊन निवेदण देण्यात आले..

यावेळी आमदार सौ.मेघनादिदि साकोरे-बोर्ङीकर जिल्हा अध्यक्ष ङाॅ सुभाष कदम.किशान मोर्चाचे उध्दवराव नाईक.भाजपा जनसेवक मा.बाळासाहेब जाधव साहेब.माजी आमदार मोहनराव फङ.विठ्ठलराव रबदङे.प्रमोद वाकोङकर.ॲङ तांळदे साहेब.रंगनाथ सोळंके.सुरेश भुमरे.सुभाष अंबट.मधुकरराव चव्हाण.विलास कच्छवे.आकाश लोहट व जिल्हातील सर्व भाजपा वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो…!!

Leave a Comment