जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड(रेल्वे)येथील दोन युवकांचा साकोली तालुक्यातील शिवणीबांध तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना

 

शैलेश राजनकर प्रतिनिधि

(दि.3 सप्टेंबर)ला घडली.सदर युवक हे पोहण्यासाठी त्या तलावात गेले असल्याची माहिती समोर आली आहे.मृतामध्ये सौंदड निवासी नितेश धनिराम सूर्यवंशी(वय 20) व श्रीरामनगर रहिवासी अमर शामराव कुंभारे(वय 20)या मुलाचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच आजुबाजूच्या नागरिकांनी तलावावर एकच गर्दी केली होती.ते बुडत असल्याचे दिसताच त्याठिकाणी हजर असेलल्या स्थानिकांच्या सहकार्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.हे दोन्ही युवक आयटीआयचे शिक्षण घेत होते.तब्बल दहा वर्षानंतर शिवनीबांध जलाशय भरल्याने पर्यटकांची सध्या त्याठिकाणी मोठी गर्दी बघावयास मिळत आहे.त्यातच पोहण्याचा आनंद घेण्यासाठीही युवक तिथे जाऊ लागले आहेत.

Leave a Comment