जिल्हा स्तरीय शैक्षणिक कार्यबल बैठक ही जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मदतगार ठरणार.-डॉ विनित मत्ते यांचे प्रतिपादन.

 

गडचिरोली- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने G20 शैक्षणिक कार्यबल जिल्हा स्तरीय पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर एक दिवसीय परिसंवाद कार्यशाळा दिनांक 15/06/2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि निपुण भारत अभियान अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जी २० अनुषंगाने मुलांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हा स्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेत फुलोरा उपक्रम आणि गडचिरोली जिल्ह्यातील राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उपक्रमाची चर्चा करण्यात आली. निवडक सादरीकरण घेण्यात आले. बालके ही राष्ट्राची संपत्ती आहेत त्यांना योग्य शैक्षणिक गुणवत्ता प्रदान करून जतन करणे गरजेचे आहे. प्राथमिक शिक्षण हा देशाचा पाया आहे त्यामुळे तो भक्कम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले करण्यात आले.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते, उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विवेक नाकाडे, डॉ. दिलीप बारसागडे, अधिव्याख्याता मिलिंद अघोर, वैशाली येगोलपवार आदी मान्यवर उपस्थित होते.

G20 Summit चे महत्व, उद्देश, कार्य याबाबत समाजामध्ये व्यापक प्रमाणात वैचारिक जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीने जनचळवळीच्या माध्यमातून राज्य स्तर ते शाळास्तर, गावपातळीवर वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजन व अंमलबजावणी करिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख, उपक्रम शिक्षक,अंगणवाडी सेविका सहभागी झाले होते. या कार्यशाळेला गट साधन केंद्र आरमोरी,गडचिरोली, एकात्मिक बालविकास प्रकल्प गडचिरोली,प्रथम एज्युकेशन फाउंडेशन,सिखे फाउंडेशन, संपर्क फाउंडेशन,गट साधन केंद्र चामोर्शी,पालवी प्रोजेक्ट धानोरा आदीकडुन विविध शैक्षणिक उपक्रमाच्या साहित्याचे प्रदर्शनाचे स्टाल लावण्यात आले होते.

जिल्हा स्तरीय कार्यबल बैठक दरम्यान अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार,मिलींद अघोर,गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे,केंद्र प्रमुख राजेश वडपल्लीवार,डॉ विजयकुमार रामटेके,गुरुराज मेंढे,खुर्शीद शेख,देवेंद्र लांजेवार,विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते आदी तज्ञ मार्गदर्शकांनी विविध शैक्षणिक उपक्रमावर सुलभनासह कार्याचे सादरीकरण केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक वैशाली येगोलपवार यांनी केले तर सुत्रसंचलन जिल्हा समुपदेशक प्रभाकर साखरे,आभार प्रदर्शन जिल्हा फुलोरा समन्वयक कुणाल कोवे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तपन सरकार, सुनील उंदिरवाडे,अंकीत जोशी,किरण काळबांदे व सर्व विषय साधनव्यक्ती व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment