ता.शिराळा येथे तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्यां अध्यक्षस्थानी महीला आघाडी सचिव निताताई बनसोडे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणुन प.म.महीला आघाडी सौ.मंगलताई नांगरे व सांगली जिल्हा अध्यक्ष मा.तुषार शिदे शिराळा तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव कांबळे,सचिव बाळासाहेब कांबळे
महासचिव डॉ.विनोद झाडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. शिराळा येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य महीला आघाडीच्यां निताताई बनसोडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले व त्यांनी छोटेखानी भाषणांमध्ये सांगितले की,भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे “भारतीय संविधान” 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस,अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावेळी तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या महीला आघाडी सचिव निताताई बनसोडे व जिल्हा अध्यक्ष मा.तुषार भाऊ शिंदे,मा. ज्ञानदेव कांबळे, मा.बाळासाहेब कांबळे,डॉ.विनोद झाडे,मा.अनिकेत पवार मा.ओंकार पाटील संजय माने विशाल खोत व महीला आघाडी कार्यकरत्या सौ.मंगलताई भीमराव नांगरे
सौ.ज्योतीताई अवघडे सौ.विद्याताई सोनवने सौ.प्रगतीताई घोलप सौ.सुनीताताई घोलप सौ.यशवंतीताई चांदणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..