जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती जिल्हा स्तरिय चर्चा सत्र (डी एल सी)…..

 

उषा पानसरे असदपूर
दिनाक 29 एप्रिल अमरावती

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 देशामध्ये परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या हेतूने देशपातळीवर व राज्यांमध्ये (राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा/ राज्य अभ्यासक्रम आराखडा) निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.अभ्यासक्रम निर्मितीप्रक्रियाच्या अनुषंगाने राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अमरावती व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना प्राप्त झालेली आहे.
राज्याचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा(एन सी एफ)/ राज्य अभ्यासक्रम आराखडा(एस सी एफ) मध्ये समावेश करण्यात येणाऱ्या बाबींच्या पूर्ततेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(डाएट) अमरावती च्या वतीने दिनांक 22 एप्रिल, 2022 ला संस्थेत एक दिवसीय जिल्हास्तरिय चर्चासत्र (डी एल सी) संपन्न झाले. सदर डी एल सी चे समन्वयन व मार्गदर्शन एन सी ई आर टी नवी दिल्ली येथून श्री. विशाल पाजणकर, सहाय्यक प्राध्यापक व आर आई इ भोपाळ येथील श्री. संजय पंडागळे सहाय्यक प्राध्यापक यांनी केले. एन ई पी 2020 मध्ये निश्चीत केलेल्या इ सी सी इ , शालेय शिक्षण I & II , शिक्षक शिक्षण, प्रौढ शिक्षण या डोमेन प्रमाणे 5 गटात विभागणी करण्यात आली होती. यात एकूण 80 सहभागींनी सक्रीय प्रतिसाद नोंदविला.
प्रत्येक डोमेन मध्ये अंतर्भूत प्रश्नांचा सखोल व विविध संदर्भाने चिंतन करून डोमेनमधील प्रश्नांच्या परिणामकारक पूर्ततेसाठी लिखित स्वरूपात मते मांडून प्रश्न निहाय अपेक्षित उत्तरांचा समावेश करण्यात आला. डोमेन निहाय निश्चित केलेल्या गटांमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती मधील ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, अध्यापक विद्यालय प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, विषय साधन व्यक्ती,पालक,अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका,विद्यार्थी, शिक्षण तज्ञ व शिक्षण प्रेमी इत्यादी अभ्यास व चिंतन असणाऱ्या शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. यासोबतच संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, प्रशांत डवरे,पवन मानकर अधिव्याख्याता यासह संस्थेतील विषय सहायक सहाय्यक,कैवल्य फौंडेशनचे समन्वयक स्वप्नील बनसोड आणि ज्योत्स्ना मेहकरे आणि फेलो व इतर कार्यालयीन कर्मचारी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सहभागी घेतला.

Leave a Comment