इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
राज्य महामार्ग 753 सी हा मुंबई ते नागपूर राज्य महामार्ग आहे या मार्गावरच राहुरी येथे खडकपूर्णा नदीवरील ऐतिहासिक पुल आहे . या पुलाला खूप मोठा इतिहास आहे ,
येथून वाहनाची नेहमी वर्दळ सुरु असते मात्र मागील काही वर्षापासुन हा पुल कमकुवत असल्याने या पुलावरून वाहतूक पूर्णपने बंद करण्यात आली आहे आणि ते हि जिल्हाधिकारी यांच्या आदेश नुसार . मात्र एस टी महामंडळ आदेशाचे उल्लंघन करीत असून ठेंगा दाखवित बसेस ह्या कमकुवत पुला वरून नेण्यात येत आहे.
दिनांक 14 ऑगस्ट रोजी या पुलावरून बस क्र. एम एच ४० वाय ५६६२ वाशीम ते नाशिक जाणारी ही बस जात असताना तिचे एक्सल तुटले परिणामी बस हि पुलावरच बंद पडली. छोटी –छोटी वाहने या पुला वरूनच ये –जा करीत असताना वाहतूक खोळंबली. वास्तविक पाहता या पुला वरून बस नेण्यास सक्त मनाई आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभाग सोबत चर्चा करून व पुला बाबत अभियंता यांच्या कडून तपासणी हि करण्यात आली अहवालानुसार थोडी दुरुस्ती करण्यात आली
मात्र जास्त काही फरक जाणवला नाही . त्या मुळे काही मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून या पुला वरून कोणतेही वाहन नेऊ नये या बाबत सक्त मनाई करण्यात आली आहे. व या बाबतीत किनगाव राजा ठाणेदार वाघमारे यांनी फलक लाऊन बरीकेटस हि लावलेले आहे. वाहने सुरळीत जावी यासठी वळण मार्ग आहे मात्र महामंडळ बस चालक व इतर वाहन धारक हे फलक कडे काना डोळा करून कमकुवत पुलावरून जात असतात. काही मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदारी कोण घेणार असा सवाल करण्यात येत आहे.
या बाबत किनगाव राजा ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि,पुलावरील जड वाहतूक बंद करण्या साठी व बैरिगेट लावण्या बाबत आणि नामफलक साठी संबधीत विभागाला दोन वेळेस पत्र व्यवहार केला पण उत्तर मिळाले नाही म्हणून पोलीस स्टेशन च्या वतीने नामफलक व बैरीगेट लावण्यात आलेले आहे तसेच वाहने हि पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. स्वत: सोबत दुसर्याचे जीव धोक्यात घालून पुला वरून वाहने नेऊ नये. असे काही निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल.