तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना मोहन माला पुस्तक भेट .
यावल/ /प्रतिनिधी विकी वानखेडे
जिल्हाधिकारी महोदय आयुष प्रसाद यांनी यावल येथील तहसील कार्यालयात व नगरपरिषद यावल येथील सभागृहामध्ये सर्व विभागातील अधिकाऱ्यांची नुकतीच आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये यावल तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते त्यात त्यांनी महसूल विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले प्रामुख्याने महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी अवैध वाळू वाहतूक मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले
.तसेच सातबारा संगणकीकरण मध्ये यावल तालुक्याने पूर्ण शंभर टक्के काम पूर्ण केले आहे तसेच महसुलीची वसुली सुद्धा करण्याचे त्यांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना सांगीतले ई पीक पाणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त पाणी करून घेण्याचे सुद्धा सांगितले जेणेकरून पिकाचे नुकसान भरपाई विमा तसेच विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येईल.
तसेच शेळगाव बँरेज सुद्धा गाळमुक्त करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तसेच यावल तालुक्यात तीन नवीन मतदान केंद्र स्थापन राजकीय पक्षांनी बूथ लेवल एजंट यांची नेमणूक लवकरात लवकर करून घ्यावी .गणेश उत्सव लक्षात घेता गुन्हेगारी वृत्तीच्या गुन्हेगारांना हद्दपारच्या प्रस्ताव तसेच ज्यांच्या वरती किरकोळ स्वरूपाचे गुन्हे नोंद आहे त्यांना नोटिस व दोषारोप पत्र काढुन प्रांत अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात येईल .
या गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देऊन नियोजन करण्यात आले आहे .नवीन अंगणवाडी .आयुष्यमान भारत कार्ड . आधार शेडिंग .शाळांमध्ये वीस कनेक्शन .तसेच शबरी व रमाई घरकुल योजनेसाठी लक्षांक उपलब्ध असून घरकुल मागणीचे प्रस्ताव ग्रामपंचायत नि लवकरात लवकर पाठवावे .दलित वस्ती सुधार योजना मार्फत सुद्धा प्रस्ताव प्राप्त झाले असून ते सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावण्यात येणार आहे रोजगार हमी मार्फत सुद्धा कामे लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे.
तसेच ज्या रेशन कार्डधारकांना रेशन धान्य मिळत नाही त्यांना सुद्धा धान्य मिळण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी बोलून लवकरच मार्ग काढणार आहे त्यावेळी प्रांत अधिकारी कैलास कडलक तहसीलदार मोहनमाला नाझीरकर गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड. बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आठवडे , शाखा अभियंता आर पी इंगळे,सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता तडवी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणगावकर साहेब . फैजपुर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावल येथील ऐतिहासिक राजे निंबाळकरांचा किल्ला येथे भेट देऊन स्वच्छता उपक्रम राबऊन स्वच्छतेची शपथ घेतली व माझे घर माझा परिसर माझे शहर माझे गाव स्वच्छ ठेवण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या त्यावेळी नगरपालिकेतील सर्व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते .
तसेच नगरपालिकेतील सभागृहामध्ये आढावा बैठक घेताना घंटागाडी कडे प्रामुख्याने लक्ष द्या ओला कचरा सुखा कचरा याच्या विल्हेवाट साठी उपाययोजना करा स्वच्छ सर्वेक्षण वरती भर द्या माझी वसुंधरा वृक्ष लागवड ग्रामस्थांच्या विविध तक्रारी निवारण करा दिव्यांगांचा निधी लवकरात लवकर वाटप करा मागासवर्गीयांसाठी विविध योजना राबवा तसेच पंधरावा वित्त आयोग अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या देखील सूचना यावेळी देण्यात आल्या नगरपालिकेच्या वसुली बाबत जिल्हाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली .