(तुकाराम राठोड,जालना)
जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथील सरपंच श्री.आनंद म्हस्के यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर भाजपाचे कार्यकर्ते आणि बूथ प्रमुख श्री.शिवाजी जाधव यांच्या अर्धांगिनी सौ.आयोध्या शिवाजी जाधव यांनी निवडणुकीमध्ये एक मतांनी विजय संपादन करून ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविला,अटीतटीच्या निवडणुकीत सौ.आयोध्या शिवाजी जाधव यांनी सौ.भागुबाई तुळशीराम जाधव यांचा चार विरुद्ध तीन मतांनी म्हणजेच एक मत जादा घेऊन विजय संपादन केला आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय नामदेव लहाने,स्वाती विजय लहाने, रूखमनबाई नामदेव सुरसे यांच्यासह ज्ञानेश्वर बोडके, त्र्यंबक बोडके,विष्णू कापसे,रामाआप्पा काटकर,अंबादास काटकर,प्रभू लोखंडे,तेजराव शिंदे,विनायक जाधव,बबनराव कांबळे,दीपक कांबळे,भाऊसाहेब लहाने व अंबादास लहाने यांच्यासह ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच सौ.आयोध्या शिवाजी जाधव यांचे अभिनंदन केले.