सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे यामध्ये अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा सुद्धा समावेश आहेसाखरखेर्डा येथे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप हे प्रमुख पक्ष आपापले उमेदवार मैदानात उतरणार असून यावर्षी साखरखेर्डा येथे नवीन सरपंच कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे !अनेक दिग्गज उमेदवार या वेळी मैदानात उतरल्यामुळे साखरखेर्डा येथील ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची व अतीतटीच्या होण्याची शक्यता आहे सर्व उमेदवार आपापल्या कामाला लागले असून कडक थंडीमध्ये उमेदवार घरोघरी प्रचार करत आहेत कडक थंडीमध्ये साखरखेर्डा येथील वातावरण गरम झाले असून राखीव प्रवर्गातील जागेसाठी जात पडताळणी करण्याकरता लागणाऱ्या कागदपत्रांसाठी प्रमुख उमेदवाराची सध्या धावपळ बघायला मिळत आहे ‘महिला उमेदवार असतील तर माहेर कडील लागणाऱ्या कागदपत्र आणण्यासाठी अनेक जावई सासुरवाडी तळ ठोकून बसले आहे !तर निवडणूक आयोगाने लावलेल्या जाचक अटीमुळे अनेक उमेदवारांची कागदपत्र काढण्यासाठी दमछाक होत आहे !सध्या जसजशी निवडणुकीची अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे तस तसे उमेदवार कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करताना सध्यातरी दिसत आहेत !