जवाहर नवादेय विद्यालय घोट येथे विद्यार्थी व गावकऱ्यांसाठी शालेय आरोग्य तपासणी उपक्रम.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी गुणवत्तेचे केंद्र स्थान म्हणून सुपरिचित असलेले जवाहर नवोदय विद्यालय घोट कडे बघितले जाते.या विद्यालयात शिक्षण पूर्ण करून जे विद्यार्थी
डाक्टर म्हणून तयार झाले त्यांच्याकडूनच आज विद्यार्थी आणि गावकऱ्यांची शालेय आरोग्य तपासणी मोफत मध्ये केली हे विशेष.
विद्यालयाचे प्राचार्य राजन गजभिये यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार ला सदर उपक्रम हाती घेण्यात आला.त्यामध्ये नवोदय विद्यालय घोट येथील ४३० विद्यार्थी आणि जवळपास १६० गावकऱ्यांनी तपासणी करून घेतली.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच श्रीमती रूपाली दुधबावरे यांनी केले तर प्रमुख अतिथी प्राचार्य राजन गजभिये,उपप्राचार्य विजय इंदोरकर,विद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
दरम्यान यावेळी ११ डॉक्टरांनी योगदान दिले त्यामध्ये डॉ चंद्रशेखर शानगोंडा,डॉ श्रध्दा गजभिये,डॉ चेतन आकरे,डॉ महेंद्र पेदढाला,डॉ सुरज धर्मपुरीवार,डॉ यशवंत दुर्गे,डॉ स्वप्नील राऊत,डॉ अविनाश टेकाम,डॉ किर्ती पवार आणि डॉ खुशबु दुर्गे यांचा समावेश आहे.

धावपळीच्या जीवनात माणूस हा आपल्या शरीराकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाहीत त्यामुळे प्राचार्य राजन गजभिये यांनी सदर शिबिराचे आयोजन केले व डॉक्टरांनी जी वैयक्तिक आणि सामाजिक बांधिलकी दाखवून विद्यार्थ्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठी योगदान दर्शविले त्या बद्दल सर्व डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment