जळगाव न प चे मुख्य अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नगरसेवकांचा आत्महत्येचा प्रयत्न

0
524

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद प्रतिनिधी :-

जळगाव जामोद नगरपरिषद चे वादग्रस्त अधिकारी आशिष बोबडे हे नेहमीच वादात रहात असून विरोधी पक्षाचे नगरसेवकांना विश्वासात न घेता नगरपरिषद चा कारभार करत आहे. याच प्रमाणे जळगाव शहराच्या मध्यभागी असलेले दुर्गा चौकातील व्यापारी संकुल मधील गाळेलिलावाची कोणालाच माहीत नसताना ती ई निविदा काढली व आपल्याजवळील ठेकेदारांना व लोकांना त्याच्यामध्ये हर्रासी साठी निविदा भरायला सुरुवात केली होती वास्तविक पाहता शहरांमध्ये लाऊड स्पिकर फिरून शहरांमध्ये माहीती देणे बंधनकारक असल्यावरही मुख्याधिकारी यांनी तसं न करता आपली मनमानी केली याचाच जाब विचारला व जळगाव नगरपरिषद मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच व्यापारी गाळेलिलावाची मुदत वाढून व्यापारी गाळे गरजूंना मिळावीत यासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला असता त्यांनी समाधान कारक उत्तर न दिल्याने त्या ठिकाणी वातावरण तापले म्हणून नगरसेवक गजानन वाघ, रमेश ताडे यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्महत्या करण्या चा प्रयत्न याठिकाणी केला शिवसेनेचे नगरसेवक गजानन वाघ व रमेश ताडे हे अंगावर पेट्रोल घेत असताना त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपस्थित होते म्हणून एक मोठा अनर्थ त्या ठिकाणी टडला हे सगळं पाहून मुख्याधिकारी यांनी माघार घेत व्यापारी गाळे लिलावाची मुदतवाढ करण्याचा लेखी आश्वासन नगरसेवक गजानन वाघ ,रमेश ताडे , अर्जुन घोलप कृष्ण केदार, संदीप मानकर यांना दिला. त्यानंतर त्याठिकाणी तापलेला वातावरण शांत झाल्याचे दिसून आले मुख्यधिकारी यांच्या ह्या मनमानी कारभाराला पाहून शहरातील जनता रोष व्यक्त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here