गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव ते जामोद रोड चे काम गेल्या सात ते आठ महिन्याअगोदर झाले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत रोडला जागोजागी खड्डे पडलेले आहेत व ठिकठीकाणी रोड उखडत आहे त्या रोडवर निकृष्ठ दर्जाचे मटेरियल टाकल्याने रोडची पहिल्याच पावसात दुरावस्था झालेली आहे त्याबाबत सूनगाव येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना गेल्या दोन ते तीन महिन्याअगोदर लेखी तक्रार दिली होती परंतु सुस्तावलेल्या बांधकाम विभागाने त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही जळगाव ते जामोद या रोडला ठिकठीकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत व खड्डे सात ते आठ इंच खोल खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रोडवरून जात असताना वाहनाला मोठा हादरा बसतो व वाहन पडण्यास कारणीभूत हे मोठमोठे खड्डे ठरतात मोटरसायकल स्वारांना तर या खड्ड्यातून मोटर सायकल चालवता येत नाही परिणामी या खड्ड्यांमुळे बरेच अपघात घडलेले आहेत व या खड्ड्यांमुळे गेल्या सात ते आठ महिन्यात बरेच अपघात झालेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी संगनमत करून या रोडचे काम निकृष्ट दर्जाचे केलेले आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे