गजानन सोनटक्के
जळगांव जामोद प्रतिनिधी:-
आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटी जळगाव जामोद च्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जळगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाची पिके अत्यल्प स्वरूपात शेतकऱ्यांच्या हातामध्ये येत आहेत या पिकांमधून शेतकऱ्यांचा शेतीमाल तयार करण्यासाठी खर्च निघणे कठीण झाले आहे त्यामध्ये जळगाव जामोद तालुक्याचे आनेवारी 54 टक्के जाहीर करून प्रशासनामार्फत शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आलेले आहे यामुळे पीक विमा ही शेवटची आशा आहे दुसर होताना दिसत आहे करिता जळगाव जामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 24 तास राबणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनामार्फत पिकाची योग्य ती आणेवारी जाहीर करून त्यांना या संकटातून शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर करावा यासाठी निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर अविनाश उमरकर, डॉक्टर स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील,ज्योतीताई ढोकणे, बाल गजानन पाटील, युनूस खान, अमर पाचपोर, राजू भाऊ घुटे, अर्जुन घोलप, आदींच्या सह्या आहेत.