जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुरचा उपक्रम.
अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
चामोर्शी:-जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुर ता.चामोर्शी जि. गडचिरोली द्वारा संचालित जिल्हा रक्तदाता शोध मोहीम व जनजागृती अभियान अंतर्गत आपल्या गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नये म्हणून, वेळेवर गरजू व्यक्तीला रक्त मिळवून देण्याकरिता,रक्तदाते शोधण्याच्या व जनजागृती करण्याच्या प्रयत्न करण्याच्या उद्देशाने दिनांक ४ ऑक्टोबर 2022 रोज मंगळवार ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली (तु) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, सदर रक्तदान शिबिराकरिता आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.मा.कुंदन गावडे साहेब यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन युवा मंडळ मुधोली (तु) यांच्या विद्यमानाने,ग्राम रक्तदुत रामकृष्ण दिवाकर झाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुधोली (तु) येथे आयोजित केले आहे,तरी आपण दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत उपस्थित राहून आपण राष्ट्रीय कार्यास उपस्थित राहून रक्तदान व जे होईल ते सहकार्य करावे असे आपणास युवा मंडळ मुधोली (तुकुम) वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.