वर्धा : मलक नईम दि. १७ सप्टेंबर पासून सुरू झालेला सेवा पंधरवाडा व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्याने -चेतना औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेत दिक्षांत समारोह व निरोप समारोह आयोजित करण्यात आला होता. या समारोहाला लाभलेल्या अध्यक्ष संस्थेचे सचिवमा चेतना सवाई व प्रमुख अतिथी म्हणून चेतना आय स्थानी टि. आय चे प्रr प्राचार्य श्री. सलमान शेख सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आय. टि. आयच्या निदेशक कु· सुषमा श्रीखंडे उपस्थिती होते. 1. या दिक्षांत समारोहात विजतंत्री या व्यवसायाच्या द्वितीय सत्रातील हेमंत देव्हारे यांनी प्रथम क्रमांक (95.50%), विजय निमकर यांनी द्वितीय क्रमांक (89.33%) व गौरव काटेखाये यांनी तृतीय क्रमांक (88.83%) प्राप्त केले तसेच जोडारी या व्यवसायातील अमर • वालमांदरे यांनी प्रथम क्रमांक (82.32%), विक्रांत शंभरकर यांनी व्वितीय क्रमांक (79%) व सागर धनवटे यांनी तृतीय क्रमांक (78) प्राप्त केले आहे. उत्तीर्ण व प्राविण्यप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा पुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच या कार्य समारोहाचे आयोजन कु· दिव्यलक्ष्मी नखाते निदेशक यांनी केले व समारोहाचे सुत्र संचालन – श्री. पराग नराजे व श्री. योगेश धोंगडे विजतंत्री निदेशक यांनी केले व आभार प्रदर्शन भावेश नेवारे यांनी केले. हा 1 समारोह यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कर्मचारी सुनिता गायकवाड, व विजतंत्री व जोहारी प्रथम पब सत्र प्रशिक्षणार्थीनी सहकार्य केले.