यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे
चुंचाळे तालुका यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध उपसरपंचासह सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व तो पारित देखील झाला मात्र, लोकनियुक्त सरपंच यांना अपात्र करण्यासंदर्भात ग्रामसभेची देखील मंजुरी आवश्यक असते. म्हणून आज जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी ११ वाजता पिठासिन अधिकारी पी टी देवराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राम विस्तार अधिकारी हबीब तडवी , ग्रामसेवक प्रियंका बाविस्कर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली व त्यांनंतर आता प्रत्यक्षात या सरपंचाविरूद्ध आणलेल्या ९ ग्रामपंचायत सदस्यांच्या अविश्वास ठरावाच्या विरूद्ध झालेल्या मतदानात आज ग्रामस्थांच्या मतदानास सुरूवात होवुन एकुण २२९२ मतदारांपैक्की११३० असे एकुण ५२ टक्के % मतदान झाले . यात सरपंच सौ सुंनदा पाटील यांना ६८४तर सदस्यांच्या गटाला एकुण २१६ मते मिळाली व २३० मतदान हे बाद झाली. यावल तालुक्यासह संपुर्ण परिसराचे लक्ष वेधणाऱ्या या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा पाटील यांनी विजय मिळवले आहे .
यावल तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्याविरुद्ध सदस्य व उपसरपंच यांनी अविश्वास प्रस्ताव येथील तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दाखल केला होता. तेव्हा दिनांक ७ जुन२०२१ रोजी चुंचाळे ग्रामपंचायत येथे विशेष सभा बोलविण्यात आली होती व सरपंच पाटील यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव हा पारित झाला होता. तेव्हा लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानंतर सदर अविश्वास प्रस्ताव हा ग्रामसभेतून देखील संमत होणे आवश्यक असते असा नियम असल्याने, तेव्हा जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना या संदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या व या अनुषंगाने गावात आज १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन अविश्वास संर्दभात मतदान घेण्यात आले. मतदान येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत एका मतदान केन्द्रावर प्रत्यक्षात जावुन ग्रामस्थांनी आपल्या मतदानाचा द्वक, या मतदानात एकुण २ हजार९२ पैक्की ११३० मतदारांनी मतदानात सहभाग घेतला .
तेव्हा चुंचाळे गावातील शाळेतील मतदान केन्द्रा बाहेर ग्रामस्थांची मोठी केली होती सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरू होती .या विशेष ग्रामसभेच्या पिठासन अधिकारी म्हणुन कृषी अधिकारी पी.टी. देवराज यांनी काम पाहीले तर ग्रामसेवक यांनी त्यांना सहकार्य केले . या ग्रामसभेच्या माध्यमातून अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यात आले असुन यात ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून मोठया मतदानाने विजयी माळ त्यांच्या गळयात घातली असुन , लोकनियुक्त सरपंच यांच्या विरुद्ध दुसऱ्यांदा मतदान करण्याची ही राज्यातील दुसरी तर जळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत स्तरावरील ही प्रथमच कार्यवाही असून याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. यावेळी पोलीस निरिक्षक सुधिर पाटील व पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस कर्मचारी यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला होता . चुंचाळे ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदावर दुसऱ्यांदा विजयी माळ घालुन आपल्याला निस्वार्थ सेवेची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थांचे मनस्वी आभार मानले .