यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे
यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील एका 60 वर्षीय वृद्ध इसमाचा शेत विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून मयत इसमाचे नाव डिगंबर सदु कोळी असे आहे.
चुंचाळे ता. यावल येथे डिगंबर सदु कोळी वय 60 वर्ष हे राहतात सोमवारी सकाळी नऊ वाजता ते गावालगत असलेल्या संजय पाटील यांच्या शेत गट क्रमांक 3 मध्ये शेत विहिरी जवळ काम करत होते दरम्यान त्याच वेळी त्यांचा पाय घसरून ते शेत विहिरीत पडले सदर प्रकार शेतमजुरांच्या निदर्शनास येतात त्यांनी तातडीने विहिरीजवळ धाव घेतली मात्र डिगंबर कोळी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तातडीने नागरिकांना माहिती देण्यात आली व डिगंबर कोळी यांचा मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णा