चुंचाळेसह परिसराला वादळासह पावसाचा तडाखा ! केळी पिकाचे नुकसान

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

दि.31 रोजी सायंकाळी झालेल्या वादळाचा व अवकाळी पावसाचा तडाखा चुंचाळे सह परिसराला बसलेला आहे. वादळादरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील सकल भागात पाणी वाहून निघाले. तर या वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली त्याच प्रमाणे कापणीवर आलेल्या आशाबाई नेमिदास वाणी,संजुसिंग राजपुत,संजय नेवे, यांच्या शेतात केळी पिकांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.अनेक ठिकाणी तरी उभी केळी आडवी पडलेली आहे .
याबाबत सविस्तर असे की दि 31 रोजी चुंचाळे सह परिसरातील गावांमध्ये सायंकाळी 6 वाजेपासूनवादळाचा सुरुवात झाली तर जवळपास अर्धा ते पाऊण तास वादळ सुरु होते यादरम्यान खूप जोराने सोसाट्याचा वारा सुरू होता. वाऱ्याने गावातील व परिसरातील झाडे अक्षरश: हेलकावे खात होती. वाऱ्याचा वेग एवढा मोठा होता की तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वादळा दरम्यान सुदैवाने कोणासही काही इजा झाली नाही.या वादळामुळे परिसरातील शेतामधील केळी पिकांचेही नुकसान खुप मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. बऱ्याच ठिकाणी कापणी वर आलेली केळी चे झाडे अक्षरशा खाली जमिनीवर ऊन ऊन पडलेली आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कडक उन्हापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील केळी पिकास कसेबसे वाचवले मात्र कालच्या वादळामुळे ही केळी जमीनदोस्त झालेली आहे. दरम्यान चुंचाळे सह परिसरात जवळपास अर्धा तो पाऊण तास मुसळधार पडलेल्या पावसाने रस्त्यावरून अक्षरशः पाणी वाहून निघाले तर मुख्य चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालेला असल्याचे जाणवत आहे मात्र अचानक झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते.

Leave a Comment