चिखली आगाराची साखरखेर्डा रात्री मुक्कामी असणारी बस गेल्या आठ महिन्यापासून बंदच ! प्रवाशांचे हाल ! बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी !

0
364

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

कोरोना काळामध्ये सर्वच दळणवळणाची साधने बंद होती एसटी महामंडळाने सुद्धा एसटी बस ह्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता !परंतु महाराष्ट्र शासनाने अनलॉक उघडल्यानंतर एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा रस्त्याने धावू लागल्या !व यामुळे प्रवास करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला ‘परंतु अनलॉक उघडल्यानंतर ही चिखली आगराची महत्त्वपूर्ण रात्रीच्या वेळेला फेरी असणारे चिखली – मेरा खुर्द -शिंदी ते साखरखेर्डा मार्गे धावणारी बस गेल्या आठ महिन्यापासून बंद आहे !त्यामुळे रात्रीच्या वेळी मेरा खुर्द ,अंत्रि खेडेकर, मेरा बुद्रुक, शिंदी – साखरखेर्डा या मार्गाने येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहे,चिखली आगाराची चिखली ते साखरखेर्डा ही बस अतिशय महत्त्वपूर्ण आहे !औरंगाबाद -जालन्याहून रात्रीच्या वेळेस येणारे प्रवासी हे मेरा खुर्द येथे बसची वाट पहात थांबत असतात ‘तसेच साखरखेर्डा येथे जाणारे प्रवासी सुद्धा त्याच बस ची वाट बघत असतात ‘ही बस चिखली आगारातून ७ वाजता रात्रीच्या वेळेला निघतेव साखरखेर्डा येथे रात्रभर मुक्कामी असते व सकाळी सहा वाजता ही बस परत चिखलीला जाते ।सकाळच्या वेळेला औरंगाबाद – जालना – चिखली बुलढाणा याठिकाणी जाणारे प्रवासी हे त्या बसनेच प्रवास करत असतात ‘त्यामुळे ही बस बंद असल्यामुळे प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे चिखली आगाराने त्वरित चिखली ते साखरखेर्डा रात्रीच्या वेळेला मुक्कामी असणारी बस सुरू करावी अशी मागणी या वेळी प्रवाशांनी केली आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here