नासिर शहा
पातूर प्रतिनिधी
पातुर तालुक्यात लाँकडाऊनच्या काळात सर्वत्र शांतता असताना बहुतांशी व्यवसाय धंद्यामध्ये शुकशुकाट असताना अवैध व्यवसाय मात्र तेजीत असलेल्याचे दिसत आहे.पिपंळखुटा महामार्गावर एक वाहनाने दोन महिलांना उडवले एक जागीच ठार झाली व एक गंभीर जखमी तरी पण वाळू माफिया चे वाहने जोरात चालूच आहेत एका रॉयल्टी वर चार ते पाच ट्रिपा मारत वाहने खूप वेगाने जात आहेत.
एक जीव गेल्या वर सुद्धा काहीच कारवाही झालेली नाही पोलीस प्रशासन या वाळू माफियांना साथ देत आहेत असेही सांगण्यात येत आहेत ही वाळू खूप मोठ्या प्रमाणात उत्खन्न होत आहेत. अवैध व्यवसायात सर्वात जोर धरलेली वाळूची तस्करी रोखण्यात प्रशासन प्रयत्न करत असले तरी वाळूचे अवैध धंदे करणारे शिरजोर झाले असून पिपंळखुटा-चांगेफळ, नदीच्या पात्रात आता रात्रीच्या राजरोसपणे वाळूचा उपसा केला जात आहे.रात्रीच्या अंधारात काढलेली वाळू दिवसाच्या उजेडात लाखो रुपयांना विकली जात आहे.महसूल विभागाने संयुक्त कारवाई करावी हा गोरखधंदा तेजीत वाळत आहे.वाहन चालक मद्यपान करून वाहन चालत आहेत ज्या ठिकाण हुन वाळू उचलली जात आहे तो रस्ता खूप चिखलमय झाले दोन ते तीन घटना त्या ठिकाणी पण झाल्या आहेत किंचित जखमा झाल्या पण पुढे कोणाचे जीव पण जाऊ शकते या साठी जनतेने आवाज उठवायला पाहिजे विशेष कार्यकर्ते पुढारी यांनी पण दखल घेतली पाहिजे काही सांगितलं तर रॉयल्टी आहे असे सांगितले जाते तुमच्या जवळ रॉयल्टी आहे मान्य आहे पण तुम्ही जीवाशी खेळू नका असे
वाळू माफियायांच्या मनात कोणाचाही धाक राहिलेला नाही.
सस्ती,चान्नी-चतारी,पिपंळखुटा, वाहळा,बु, चांगेफळ, खेट्री-शिरपुर उमरा-पांग्ररा,राहेर-अडगांव, व पातुर तालुक्यातील अनेक गावाच्या हदीतून वाळूतस्कर भरदिवसा वाळू तस्करी करीत आहेत,काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्याच्या तक्रारी ऊतावळी नदी काठचे गावकरी करीत असतात.परंतु पातुर महसूल पथक,पोलीस पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तस्करी रोखण्यासाठी जातात मात्र ठोस कारवाई होत नसल्याने हे व्यवसाय बंद करण्यात यावे असे पिपंळखुटा-चान्नी ग्रामस्थाचे आवाहान आहे.महसूल विभागाने यांच्याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.