मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण
जळगाव:-शासनाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानूसार सेवा नियमावली ठरवून दिलेली असते आणि त्या नुसार कोणत्याही पदावरील अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या पदानुसार वर्तन आणि व्यवहार करीत असतात.
परंतू जळगाव जामोद मध्ये या नियमावलीची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.झाले असे की येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या चक्क खुर्चीवर बसून वनकर्मचारी यांनी नवीन प्रताप घडविल्याची बाब पुढे आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या खुर्चीवर बसून नवीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे नाव व पदभार केव्हा पासून सांभाळण्यात आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसत आहे.
माननीय श्री कुमार स्वामी डि. एफ .ओ साहेब आपल्याकडून आशा करतो की जळगाव जामोद रेंज हि सध्या किशोर पडोळ यांच्याकडे चार्ज असून त्यांच्या खुर्चीवर बसून.
वन मजूरची पद नाही अशा माणसाला आर .एफ .ओ यांच्या खुर्चीवर बसून वन विभागातील सरकारी कम्प्युटर वापरणे व गोपनीय सरकारी दस्तावेज वन विभागाच्या बाहेर नेणे व गोपनीय माहितीचा बाहेर दुरुपयोग करणे या सर्व प्रकाराची चौकशी करून सध्या कार्यरत असलेल्या आर एफ ओ पडोळ साहेब यांनी स्वतःची सुद्धा चौकशी करून लवकरात लवकर आपल्या स्तरावरून मला समाधानकारक उत्तर मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली आहे.