घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम तात्काळ सुरु करा

 

सोमवार पर्यंत बांधकाम सुरु न केल्यास उपोषण – विवेक बोढे यांचा इशारा

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस सारख्या औद्योगिक शहरात ग्रामीण रुग्णालय व्हावे याकरिता मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन मंत्री, महाराष्ट्र शासन तथा तत्कालीन पालकमंत्री असतांना घुग्घुस येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली. घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाकरिता आवश्यक निधी अर्थसंकल्पात मंजुर करण्यात आला होता. नंतर सत्ता परिवर्तन झाले व महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले नंतर कोरोनाचे कारण देत सरकारने घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाची निविदा काढण्यास नकार दिला आता निविदा झाली आहे.
दिनांक 11/11/2021 ला नवीन मंजूर ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु करण्यात आले. परंतु हे सुरु झालेले काम भूमिपूजन करण्यासाठी बंद करण्यात आले. मागील 23 दिवसांपासून रुग्णालयाचे बांधकाम बंद आहे.

घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या 40 ते 50 हजाराच्या जवळपास आहे. कोविडचे संक्रमण सुरू आहे. या काळात आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. शासन यंत्रणा वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. ग्रामीण रुग्णालायचा विषय घुग्घुस वासियांच्या स्वास्थ व आरोग्याशी संबंधित निगडित आहे. घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे सुरु झालेले काम राजकीय हेतूने बंद करणे हे घुग्घुस वासियांच्या जीवाशी खेळणे आहे. असे कृत्य सामान्य नागरिक खपवून घेणार नाही. नवीन मंजूर झालेल्या घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे काम सोमवार दिनांक 6/12/2021 पर्यंत सुरु न केल्यास भाजपातर्फे उपोषण करण्यात येईल असा इशारा *भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार* भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने भाजपाचे अनंता बहादे उपस्थित होते.

Leave a Comment