घाटाखालील पाचशे कार्यकर्त्यांचा ‘प्रहार’मध्ये प्रवेश जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात कार्यक्रम

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात संग्रामपूर, जळगाव जामोद व शेगाव या तीन तालुक्यांतील पाचशे कार्यकत्यांनी ‘प्रहार’मध्ये प्रवेश घेतला. पक्षाचे राज्य सचिव गणेश पुरोहित, सहसचिव रविंद्र सुर्यवंशी, ज्येष्ठ नेते गजानन लोखंडकार, सुरज खारोडे, उपजिल्हाप्रमुख अजय टप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
‘प्रहार’चे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य मंत्री ना. बच्चू कडू यांनी पक्षसंघटन वाढविण्यासह ग्रामीण भागात पक्षाच्या शाखा स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्याच अनुषंगाने बुलडाणा जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी २ डिसेंबर रोजी घाटाखालील शेगाव, संग्रामपूर व जळगाव जामोद या तीन तालुक्यांचा दौरा केला. या तीन तालुक्यांत सोनाळा, टुनकी, वरवट बकाल, संग्रामपूर, जळगाव जामोद, जानोरी यासह विविध ठिकाणी बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधण्यासह ‘प्रहार’मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे ध्येय धोरणे आणि विचार तळागळापर्यंत पोहचून ना. बच्चू कडू यांनी जनसेवेचा दिलेले व्रत ‘प्रहार’च्या माध्यमातून प्रामाणिकपणे पुढे नेण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असे आवाहन यावेळी बोलताना वैभवराजे मोहिते यांनी केले. दिव्यांग बांधव, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले तसेच निराधार, निराश्रीत, गरजुंच्या मदतीसाठी सर्वात आधी धाऊन येणारी संघटना आणि पक्ष म्हणून ‘प्रहार’कडे पाहिले जाते आणि हीच खरी आपली ओळख आहे. ही ओळख यापुढेही कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी राजकारणाला दुय्यमस्थान देऊन जनसेवेला महत्व द्यावे, अशी शिकवण ना. बच्चू कडुंची आहे आणि हाच विचार घेऊन प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता कार्यरत असल्याचेही यावेळी वैभवराजे माहिते यांनी सांगितले. या तीनही तालुक्यातील सुमारे पाचशे कार्यकर्त्यांनी वैभवराजे माहिते यांच्या नेतृत्वात ‘प्रहार’मध्ये प्रवेश घेतला. यावेळी संग्रामपूर मित्र परिवाराचे शंकर पुरोहित, बाळू वहितकार, मो. तोसीब जमदार, अर्जून सोळंके, पंकज पाटकर, अक्षय देशमुख, दीपक बोयाखे, गजानन शिरोडकर, विकास बागतकर, प्रशांत येले, गणेश इंगळे, सुभाष डोमाळे, राहुल तायडे, आकाश वानखडे, आनंद काटे, पंजाब घाटपवार, सुमित तायडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी ‘प्रहार’मध्ये प्रवेश घेतला.

Leave a Comment