घर टॅक्स वाढीच्या निषेधार्थ सिंधी रेल्वेत नगर पालिका कार्यालयास राष्ट्रवादीचा नागरिकांसह घेराव.

 

राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरिकांसह मुख्याधिकाऱ्यास घेरले.

जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करून तोडगा काढण्याची मागणी केली असुन , तोडगा न निघाल्यास करणारं तीव्र आंदोलन…. अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

प्रमोद जुमडे सिंधी रेल्वे/वर्धा

हिंगणघाट – वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे घर टॅक्स दरात 35 ते 40 टक्के वाढ केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व संतप्त नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालीत वाढ केलेला घर टॅक्स तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे…

यावेळी शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अतुल वांदिले यांच्यासह मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित होते यादरम्यान सिंधी रेल्वे येथील संतप्त नागरिकांनी देखील नगरपालिका प्रशासनाच्या गोंधळ धोरणाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता.

सिंधी रेल्वे येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी तीस तीस दिवस गैरहजर असतात, यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित राहत असल्याची ओरड सुरू होती. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल बांधले यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सिंधी रेल्वे येथे जात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व नागरिकांना सोबत घेऊन अचानक नगरपालिकेत मुख्याधिकारी कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला

अचानक घातलेल्या घेरावाने मुख्याधिकारी कार्यालयातील सर्वांच्या मोठ्या गोंधळ वळला होता. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोलून तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल गांधी यांनी दिलेला आहे एकंदरीतच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नाबाबत सिंधी रेल्वे मध्ये लढणारा योद्धा मिळाला असल्याने सिंधी रेल्वेतील नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता…

, न.पा. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे सामान्य जनतेची आर्थिक लूट होत आहे. घरगुती कर आकारणी मध्ये दरवर्षी ४ ते ५ % ने वा होत असल्यास सामान्य नागरीक कर सहजरित्या भरु शकतो. परंतु प्रशासनाने त्या करात (टॅक्स) एकदम कुठे तीन पट्टीने तर कुठे चार पट वाढ केली आहे. अशी भरमसाठ वाढ सामान्य नागरिकांना न परवडणारी आहे.

आधीच जनता महागाइने त्रस्त झाली आहे वरून घरघुटी टॅक्स अव्याच्या ढव्या स्वरूपात नगर पालिका वसूल करत आहे यामधे सामान्य नागरिकांना वर काय बितत असेल.

यातून असे लक्षात येते की, सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे. *तसेच नगर पालिकेला या आधी देण्यात आलेल्या निवेदनात तात्काळ सुधारणा करा याबाबत १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता तरीही याकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच न.पालिकेचे मुख्याधिकारी हे महिना – महिनाभर न.पा. कार्यालयात उपस्थित राहत नाही व या कार्यालयात कर्मचाऱ्याची सुद्धा कमतरता आहे.

नगर पालिकेचा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा परिणाम सामान्य जनतेला सोसावा लागत आहे. शासन व प्रशासनाने याकडे गांर्भियाने लक्ष देण्याची गरज आहे. असे खडे बोल प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांनी मुख्याधिकर्याला सुनावले.

करिता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले संपूर्ण पदाधिकारी व येथील जनतेसह नगर पालिकेला घेराव घालून आंदोलन करीत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी ही न.पा. प्रशासनाची राहील.

यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष तथा माजी सभापती कृ.उ.बा.स.बबनरावजी हिंगनेकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी उपाध्यक्ष न.प.सुधाकरराव खेडकर, प्राचार्य तथा माजी उपाध्यक्ष अशोकजी कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अशोकबाबू कलोडे, अमोल बोरकर, वसंताजी सिर्से, गजाननराव डबारे, प्रकाश सोनटक्के, युवा शहर अध्यक्ष तुषार हिंगणेकर,माजी नगरसेवक सुमनबाई पाटील,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बबलू खान,अशोकबाबू कलोडे, पंकज बावणे, धमेद्र बडविक, प्रशांत कलोडे, जगदीश बोरकुटे, गुड्डू कुरेशी, गजानन खंडाळे, सुनील शेंडे, अशोक सातपुते, रवी राणा, युगल अवचट, मनोहर चंदनखडे, सुनील भुते, पप्पू आष्टीकर, विरेंद्र उर्फ बब्बा देशमुख, संदीप ठमके यांचासह सिंदी(रेल्वे) येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment