घरगुती गँस,पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात जळगाव जामोद शिवसेनेच्यावतीने निवेदन देत केला केंद्र शासनाचा निषेध…

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

सतत होत असलेल्या घरगुती गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल च्या किमतीच्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे असे असताना सुद्धा केंद्र सरकार इंधनाचे दर दररोज वाढतच आहे त्यातच आतापर्यंत लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेच्या हातचा रोजगार गेलेला असताना केंद्र शासन काही केल्या ह्या दररोज गगनाला भिडत असलेल्या किमती काही केल्या कमी करत नाही. आंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर कमी असताना सुद्धा देशासह महाराष्ट्रात दररोज डिझेल पेट्रोल व घरगुती गॅसचे दर वाढत आहे त्यामुळे गरीब लोकांना केंद्र सरकार तर्फे उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले आहे या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांकडे सिलेंडर भरण्याकरिता पैसे नाहीत त्यामुळे त्यांना शेतातील लाकडे आणून त्यावर उदरनिर्वाह करावा लागत आहे परिणामी पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे डिझेल पेट्रोलचे दर वाढल्यामुळे महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तरी शासनाने ह्या वाढत असलेल्या इंधनाच्या किमती ताबडतोब कमी करण्याबाबत उपाय योजना कराव्यात सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीतून मुक्त करावे अशा आशयाचे निवेदन दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर तुकाराम काळपांडे शिवसेना जिल्हा उपप्रमुख, गजानन वाघ शिवसेना तालुका प्रमुख,पुंडलिक पाटील, उपतालुका प्रमुख सुनील मोरखडे उपतालुकाप्रमुख,देविदास घोपे उपतालुका प्रमुख, रमेश ताडे नगरसेवक तथा शिक्षण सभापती जळगाव जामोद,संजय भुजबळ, शांताराम धोटे,अशोक टावरी,गजानन दातीर,मुस्ताक भाईजान, दिलीप आकोटकार, संतोष बोरसे, शिवाजी मेहसरे,अक्षय भालतडक,भगवान बाजारे,राजेश पांधी,पंडित माटे,कैलास राजपुत, विशाल पाटील, वैभव जाणे,वसंता रोजतकर,अंबादास चौधरी,गुड्डू काजी,युवराज देशमुख, रमेश हागे, यांच्यासह भाऊ सांगे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Leave a Comment