सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी।
कन्नड तालुक्यातील गवताळा व्हॅली इंग्लिश स्कूल या शाळेच्या व्यवस्थापनाकडून हेतुपुरस्कर पणे सक्तीने ती वसुली केली जात आहे एकीकडे covid-19 चा प्रादुर्भाव लॉक डाऊन बिकट आर्थिक परिस्थिती आणि आता ओला दुष्काळ या सर्व बाबींमुळे नोकरवर्ग सोडला तर शेतकरी शेतमजूर व्यापारी खाजगी कर्मचारी अत्यंत आर्थिक अडचणीत सापडला आहे परंतु दुसरीकडे शालेय शिक्षण विभागातर्फे शक्तीने वसुली करू नये असे आदेश असताना शासनाच्या नियमां ना पायी तुडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे गवताळा व्हॅली इंग्रजी शाळेचे व्यवस्थापन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून शाळेची मूळ मान्यता रद्द करावी अन्यथा येत्या आठ दिवसात प्रहार स्टाईलने सदर शाळेच्या व्यवस्थापनाला धडा शिकवू असा इशाराही देण्यात आला