गोरसेनेचा जनआक्रोश महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

यापुढे मायभगीनीवरचे अन्याय खपवून घेणार नाही -प्रा.संदेश चव्हाण(गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष)
जोडगव्हाण येथील पिडीत नेहा चव्हाण मृत्युप्रकरण.

प्रतिनिधी:(वाशीम) – पुरोगामी महाराष्ट्रामधील आयाबहीणीवर दिवसेंदिवस अतिप्रसंग,अन्याय, अत्याचार होत असून,यापुढे
कोणत्याही समाजावरील मायभगीनीवरचे अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही असे प्रकार झाल्यास ठोस उत्तर मिळेल.

असे प्रतिपादन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांनी केले.मालेगाव तालुक्यातील जोडगव्हाण येथील युवती कु.नेहा गजानन चव्हाण हीच्यावर बळजबरी अत्याचार करुन विहीरीत ढकलून दिल्याने गतप्राण झालेल्या युवतीला न्याय मिळावा.

यासाठी बंजारा समाजातील अग्रगण्य असलेल्या गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात 20 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

सविस्तर माहितीनुसार,मालेगाव तालुक्यातील जोडगव्हाण येथील तरुणी नेहा गजानन चव्हाण ही तिच्या आजीसोबत वाशीम येथे राहून औद्योगिक प्रशिक्षण घेत होती.दिनांक ३० जानेवारी रोजी संघपाल सुदाम गवई व त्याच्या दोन साथीदारांनी जोडगव्हाण येथील युवती कु.नेहा गजानन चव्हाण हिच्यावर बळजबरीने अत्याचार करुन तिची हत्या केल्याचा संशय आहे.

या संदर्भात मुलीच्या आईने शवविच्छेदनापूर्वी पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन हत्याच झाल्याचा आरोप केला होता.

मात्र पोलीस प्रशासनाने कुठेतरी मिलीभगत करून आरोपींना सुरक्षीत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

सदर आरोपीवर भा.दं.वि ३७६(२),३०६,३६३,३४ असे विविध गुन्हे दाखल केले आहेत.मात्र या गुन्ह्यात सरळसरळ हत्या दिसत असताना सुद्धा खुनाचा खटला ३०२ लागू करुन सदर खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून मुख्य आरोपी संघपाल सुदाम गवई यांना फाशीची शिक्षा देणे,व इतर संशयितांना अटक करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करणे,

या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचारी तथा शवविच्छेदन अहवाल तयार करणार्‍या वैद्यकीय अधिकारी यांची कसुन चौकशी करणे,सदर प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडी यांचेकडे चौकशीसाठी सुपुर्द करणे,पिडीतांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शासनाने ३० लाखाचा निधी देऊन कुटुंबातील एका व्यक्तींला शासकीय सेवेत रुजू करून घेणे या विविध मागण्यासाठी बंजारा समाजातील अग्रगण्य असलेल्या गोरसेनेच्या वतीने दिनांक २० जानेवारी रोजी प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चाची सुरुवात क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून झाली ते वसंतराव नाईक चौक,पाटणि चौक,अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघाला.
वाशीम जिल्हातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील संपूर्ण गोरबंजारा तांड्यामधून गोरसेनेचे किमान साठ हजार कार्यकर्ते तथा सर्व समाज बांधव सहभागि झाले होते.

मागील वर्षी सुद्धा गोरसेनेच्या वतीने पुसद येथे काळी दौलतच्या शाम राठोड हत्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात जनसंख्येत लाखोंचा मोर्चा काढला होता.त्यावेळी पाच हजार पोलीस तैनात करण्यात आले होते.आता यावेळी सुद्धा पिडीत मुलीला न्याय मिळण्यासाठी गोरसेनेच्या वतीने वाशीममध्ये जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गोरसेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा संपत चव्हाण,नायकंळ शशिकलाबाई राठोड,सोनू चव्हाण व सर्व जिल्ह्याचे गोरसेना जिल्हाध्यक्ष आमी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment