सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सिंदखेड राजा तालुक्यातील रताळी गावामध्ये अवैध दारू विक्री त्यांचा जोर वाढला असून त्यामुळे दारू पिण्यासाठी तरुण व माणसे व्यसनाच्या आहारी जाऊन भांडण व चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे याबाबत महिलांनी सुमन ज्ञानेश्वर सरकटे यांच्या नेतृत्वामध्ये साखरखेडा पोलीस स्टेशन येथे दिनांक 11 .12 .2020 ला निवेदन दिले होते परंतु निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही असा आरोपही या महिलांनी केला आहे दारुमुळे महिलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे घरामध्ये वादविवाद होतात तसेच गावांमध्ये सुद्धा भांडणे होतात असे जर प्रकार चालू राहिला तर एखाद्याचा खून सुद्धा होऊ शकतो !तरी गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांना अटक करून कारवाईची मागणी यावेळी रताळी येथील महिलांनी निवेदनाद्वारे केली आहेकारवाई न झाल्यास बुलढाणा येथे उपोषण करू असा इशारा सुद्धा महिलांनी यावेळी दिला आहे !या निवेदनावर वर्षा राजू खिल्लारे ‘अर्चना परमेश्वर गवई ‘मीना संजय खिल्लारे ‘कमलाबाई सरकटे वैशाली जाधव राधाबाई पंडित जाधव रंजना सौभागे सत्यभामा पाटील जोत्सना जाधव वंदना जाधव शारदा सोभागे अलका जाधव आशा सोभागे शालू जाधव केराबाई इंगळे नंदा सरकटे कविता सरकटे नंदाबाई दिलीप सरकटे मिनाबाई मोरे गोदावरी जाधव ज्योती सरकटे विमल खिल्लारे सुजाता जाधव कलावती पाटील आशा सौभागे पंचफुला जाधव ज्योती जाधव ‘ पुष्पा सरकटे ।लीला सरकटे ‘साधना सरकटे ‘शांताबाई खिल्लारे ‘कल्पना जाधव ‘आशा सरकटे ‘रुक्मिना खिल्लारे ‘ अरुना सरकटे ‘आधी महिलांच्या या निवेदनावर सह्या आहेत आता यावर पोलिस काय कारवाई करतात हे बघणे महत्त्वाचे ठरेल !