इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव : गणेशउत्सवात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळासाठी घोषित केलेल्या गणराया पुरस्कार व सिद्धीविनायक पुरस्कारासाठी निरिक्षण समिती गठीत करण्यात आली आहे.दोन्ही पुरस्काराच्या निरिक्षण समितीची घोषणा नाहसंचे संस्थापक किरणबापू देशमुख यांनी केली आहे.
मोतीबाग व्यायाम प्रसारक व बहुउद्देशीय संस्था व नागरी हक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विधमाने सदर पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून गणराया पुरस्कार व सिद्धिविनायक पुरस्कारासाठी निरिक्षण समिती मध्ये अनुक्रमे 9 व 8 सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
11 हजार रुपये व फिरती ढाल असे स्वरूप असणाऱ्या गणराया पुरस्कार समितीमध्ये नाहस तर्फे सदस्य म्हणून विजय ढगे, मोतीबाग प्रतिनिधी निकुंज देशमुख, पत्रकार म्हणून अनिल उंबरकार, वकील अड.गणेश पिसे, डॉक्टर डॉ.अभय गोयनका, प्रा.सतीष कलोरे,तहसील प्रतिनिधी विजय बोराखडे, पोलीस प्रतिनिधी गजेंद्र रोहनकार, न.प. प्रतिनिधी दिपक बांगर असे राहणार आहेत.
तर छोट्या मंडळासाठी 3 हजार रुपये व फिरती ढाल सिद्धिविनायक पुरस्कारासाठी नाहसचे दोन प्रतिनिधी अशोक गडकर, महेश देशमुख, मोतीबाग प्रतिनिधी उमेश देशमुख, पंकज तापी, पत्रकार प्रतिनिधी डॉ.जयवंतराव खेळकर,वकील प्रतिनिधी ऍडव्होकेट चेतन देशमुख, डॉक्टर प्रतिनिधी रमेश भुतडा, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.हरिदास सोळंके अशी समिती राहणार.
असून ही समिती नियोजित वेळी गणेश मंडळाचे स्थापनेपासून ते मिरवणुकी पर्यंत निरीक्षण करून आपला अहवाल बंद पाकिटात तहसीलदार शेगाव यांचेकडे जमा करतील व गणेशउत्सवा नंतर एक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घोषित करून सदरचे पुरस्कार दिले जातील.असे नाहसंचे संस्थापक किरणबापू देशमुख यांनी कळविले आहे.
@शेगाव शहरातील गणराया पुरस्कार 2023 साठी निरिक्षण समितीत पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी म्हणून लोकमत चे तालुका प्रतिनिधी तथा डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकार यांची निवड झाली आहे.
जेष्ठ पत्रकार संजय सोनोने,बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे विभाग संघटक राजेश चौधरी,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहिमभाई देशमुख,सचिव नंदुभाऊ कुळकर्णी, डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हा संघटक नारायण दाभाडे आदीसह पत्रकार बांधवांनी अनिल उंबरकर यांचे अभिनंदन केले.