गट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे भिमा काेरेगाव येथील विजयस्तंभाची येथे 45 फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आली होती

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे विजयस्तंभ उभारून शहिद झालेल्या शूर 500 सैनिकांना 1 जानेवारी मानवंदना देण्यात आली.
गावात यंदाच नवीन उपक्रमात माजी सैनिक तसेच गावातील प्रतिष्टित नागरिक सहभागी झाले होते

तत्कालीन महार आणि आताच्या बौद्ध समाजाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी संघर्ष झाला हाेता.

1818 मध्ये केवळ 500 शूर सैनिकांनी पराक्रम गाजवत शत्रूंच्या तब्बल 28 हजारांवर सैनिकांना यमसदनी पाठवून आपले प्राण त्यागले होते. या पराक्रमी इतिहासाची कायम आठवण राहावी, यासाठी पेशव्यांच्या भूमीत विजय स्तंभ मा.प्रफुल जंजाळ, मा.पंकज सिरसाट दीप जंजाळ तसेच मित्र मंडळ यांच्या अथक प्रयाणातून उभारण्यात आला होता.

यामध्ये मेजर चंद्रभान जंजाळ, मेजर अरविंद जंजाळ, मेजर सुधाकर सिरसाट, मेजर मनोहर जंजाळ, मेजर अशोक जंजाळ, मेजर राहुल जंजाळ, मेजर रमेश जंजाळ तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिकांमधें मा.सरपंच सौ.उमाताई माळी मा.गजानन वाघ, मा.पुंडलिक भटकर मा.दादाराव जंजाळ,मा.मधुकर जंजाळ,शेषराव जंजाळ, दिलीप घ्यारे, तसेच गावातील भगिनींनी सुद्धा जयस्तंभ उभारून शहिद झालेल्या शूर 500 सैनिकांना 1 जानेवारी मानवंदना देण्यासाठी सहभाग दर्शवला होता.

Leave a Comment