खाऊचा जमवलेला निधी भव्य श्रीराम मंदिरासाठी देऊन चिमुकल्या हिंदवीने उचलला खारीचा वाटा

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

लहान मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हटले जाते. निरागस लहान बालकांमधील अद्वितीय गुणांचा जेव्हा परिचय होतो तेव्हा त्याची उपमा दुसर्‍या कशालाही देता येणार नाही. दुसऱ्यांना मदतीचा हात देण्याची त्यांची सेवाभावी वृत्ती फ़ार कौतुकास्पद ठरते.
मुलं जरी वयाने लहान असली तरी इतरांना मदतीचा हात देण्याबाबत ती निवडक ठरतात व त्यांच्यातील सहकार्याची बीजे परिपक्व होत जातात. याचाच उत्तम दाखला म्हणजे नांदुरा खुर्द येथील कु. हिंदवी प्रकाश बावस्कार हिने आपला खाऊचा निधी श्रीराम मंदिर उभारणीच्या पवित्र कार्यासाठी देऊन अत्यंत कमी वयातील आपल्या औदार्य वृत्तीचा परिचय करून दिला.
अयोध्येत साकारल्या जाणाऱ्या भव्य श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाकडून स्वेच्छेने केलेली आर्थिक मदत स्वीकारली जात आहे. साकारल्या जात असलेल्या भव्य श्रीराम मंदिरास आपला सुद्धा हातभार लागावा या उद्देशाने नांदुरा खुर्द येथील चार वर्षीय कु. हिंदवी प्रकाश बावस्कार हिने गेल्या अनेक दिवसांपासून साठवून ठेवलेला आपला खाऊचा निधी हा नि:स्वार्थीपणे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन समितीच्या सदस्यांकडे सोपवीला. एवढ्या कमी वयात सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या हिंदवीच्या या सेवाभावी गुणांचा सर्वांना परिचय झाला. अत्यंत कमी वयात हिंदवीने दाखविलेल्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment