विकी वानखेडे यावल
यावल : शहरातील एका पत्रकार सह विरावली येथील एकास एक लाखाची खंडणी मांगीतली म्हणुन बुधवारी पोलिसांनी अटक केली होती तेव्हा या दोघांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक १६ जानेवारी पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील व विरावली येथील संजीव उत्तम पाटील या दोघां विरूध्द बुधवारी यावल पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवाहीतेचे दत्तक विधान व तीचे नावे करून दिलेले शेतीची कौटुंबिक वाटणीपत्र खोटे असल्याचे सांगत विवाहितेच्या पती इरफान इस्माईल तडवी रा.पुर्णवाद नगर यावल यांच्याकडे प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी एक लाखाची खंडणी मांगीतली होती.
तेव्हा दोघांना अटक केल्या नंतर गुरूवारी येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्यायधिश एम. एस. बनचरे यांच्या समोर हजर केले असता दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.-पुर्ण-