मुंबई, (ऑनलाईन न्यूज डेस्क)
क्रांतीसुर्य माळी महासंघ राज्य प्रसिध्दी प्रमूख पदी विनोद खंडारे यांची निवड करण्यात आली आहे. Krantisurya
दिनांक 12ऑक्टोबर 2023 गुरूवार रोजी श्री संत सावता माळी भवन नांदुरा येथे क्रांतीसूर्य माळी महासंघ प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी श्री. विनोद रामेश्वर खंडारे यांची नियुक्ती क्रांतीसूर्य माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अमोल वसंतराव इंगळे यांनी एका पत्रद्वारे केली आहे. सामाजिक प्रगती व महासंघाचा प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी.तसेच आपण हे समाजसेवेचे व्रत स्वीकारून आपली जबाबदारी पुर्णपणे यशस्वीरीत्या पुर्ण कराल हीच अपेक्षा व आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. असे या नियुक्ती पात्रात नमूद करण्यात आले आहे. Krantisurya #kranti
याप्रसंगी सचिव, योगेश रामभाऊ घाटे (खामगांव), उपाध्यक्ष शत्रुघनभाऊ बोचरे (शेलगाव मुकुंद), सदस्य संजयभाऊ बोंबटकार (खामगांव), दिनकर इंगळे (खामगांव), यांच्यासह माळी समाज बांधव निवृत्ती हरिभाऊ इंगळे, गजानन सातव (से.नि.पोलीस), सागर वावटळीकर, बळीराम चोपडे, राजेश निखाडे, संजय वानखडे, वसंत चोपडे, यांच्यासह माळी समाज बांधवांची उपस्थिती होती.#krantisurya