क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १२४ वा स्मृतीदिन जातेगांव येथे साजरी

प्रतिनिधी – सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १२४ वा स्मृतीदिन सामाजिक अंतर राखून साजरी करण्यात आला.महात्मा फुले चौकासह येथील ग्रामपालिका कार्यालयातही सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भारतातील स्त्री मुक्तीच्या व स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२४ व्या पुण्यतिथीचे आयोजन जातेगांव येथील प्रहार संघटनेकडून करण्यात आले. महात्मा फुले चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस भारतीय सैन्यदलातील जवान रविंद्र पगारे यांनी सपत्नीक पुष्पहार अर्पण केला व महात्मा फुलेंच्या पूतळ्यास नवनियुक्त उपसरपंच पंढरीनाथ वर्पे यांनी पुष्पहार अर्पण केला.नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार,संदिप पवार,बाळू लाठे,संतोष गायकवाड,कारभारी खिरडकर,सागर पगारे,दिपक पगारे, सोमनाथ जाधव आदींनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन केले.तसेच पिनाकेश्वर देवस्थानचे विश्वस्त बंडू पाटील, पंढरीनाथ पवार,माजी उपसरपंच नारायण पवार,शरद पवार, सोसायटी चेअरमन गोटू पवार,भरत गायकवाड,गुलाब पठाण,माजी सैनिक शरद पवार,अनिल पवार, सोपान खिरडकर,दारासिंग बिडे व पत्रकार ईश्वर जाधव यांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.यावेळी गौरी झोडगे या चिमुकलीने सावित्रीबाई फुलेंना समर्पित सुंदर कवितेचे गायन केले.याठिकाणी विविध मान्यवर व समस्त भजनी मंडळासह ग्रामस्थ आदी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रहार संघटनेचे जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे,वैभव शिंदे,रविकांत भागवत,बापू पगारे,शिवा पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

Leave a Comment