मेहकर,दि.३० :-
“जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आधाराचा तोच भार साहे’ म्हणतात ते काही खोटे नाही. असेच ईश्वराचे देवदूत म्हणून मेहकर येथील कोविड सेंटर मध्ये कोविड योद्धे काम करीत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
कोविड सेंटर मध्ये सेवा देणारे डॉक्टर, नर्स,सपाई कामगार,या देवदूतांना ‘कोरोना ऋणनिर्देश’ मानपत्र देऊन महिला सरपंचाने ऋणव्यक्त केले आहे.
पत्रकार संतोष अवसरमोल यांच्या संकल्यनेतुन
मेहकर मधील कोविड सेंटर मध्ये अविरत काम करणारे ,डॉक्टर, नर्स,सपाई कामगार, आपला जिव तळहातावर घेऊन,कोविड रुग्णांची सेवा करत आहेत.
स्वत:च्या जिवाची व परिवारांची पर्वा न करता, कोविड रुग्णांची सेवा करत, हे देवदूत कोविड रुग्णांचे प्राण वाचवत आहेत.म्हणुन या कोविड सेंटर मधील देवदूतांचे मनोबल, वाढवण्यासाठी,व ऋणव्यक्त करण्यासाठी, कृर्तत्वान महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव व पत्रकार संतोष अवसरमोल यांनी कोविड सेंटरला जाऊन डॉक्टर, नर्स ,सपाई कामगार, यांना ‘कोरोना ऋणनिर्देश’ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले व या देवदूतांचे ऋणव्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी युवानेते विजय जागृत होते तर प्रमुख उपस्थीतीत डि वाय एसपी कार्यालय मधील पि एस आय एम एस भालेराव तर पोलीस सुरेश येरमुळे,यावेळी कोविड सेंटरचे डॉ श्याम ठोंबरे ग्रामीण रुग्णालय अधिक्षक, डॉ कैलास राहटे,
डॉ विशाल सारडा ,डॉ अरविंद सरकटे ,डॉ महेश भागवत आवले ,डॉ कैलास रहाटे,डॉ वर्षा राठोड,डॉ रूपाली वाठोरे ,डॉ वर्षा व्ही जाधव,डॉ विशाल एस खत्री ,डॉ विनय अजगर ,डॉ माधुरी आर चांडक ,डॉ आकाश भिसाडे ,डॉ मनीषा संबपुरे,डॉ नम्रता कळासकर,डॉ नम्रता पाहुलकर, डॉ प्रियंका उगले, नर्स शीतल हिवाळे ,किरण संजय मुटठे, किरण बोरकर, पूजा मुंढे, पूजा रमेश चव्हाण ,चंदा कोल्हे ,अयोध्या गिरी , पदमिनी बी चव्हाण, सत्यनारायन एस खरात,राजेश पी खडसे, साहिल खान इजाज खान, शंकर नखाते,फिरोज नौरंगबादी,व ईतर कोविड सेंटरचे सपाई कामगार ,स्वयपांकी यांना महिला सरपंच सौ ताई गजानन जाधव व पत्रकार संतोष अवसरमोल यांनी कोरोना ऋणनिर्देश मानपत्र व रुमाल टोपी देऊन कुमकुम लावुन ओवाळण्यात आले.तर डॉक्टर मॅडम व नर्स मॅडम यांना ब्राऊज पिस , मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे,या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन जाधव,संदिप जाधव,संजाबराव धोंडगे,पंढरी धोंडगे,सुरज अवसरमोल, मंगेश वानखेडे, योगेश पवार, भारत अवसरमोल,यांनी प्रर्यत्न केले.