कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार यांचे श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याशी कोल्हापूर बोलोली येथे बैठक

 

तानाजी कुऱ्हाडे कोल्हापूर
_______________________________________
कोल्हापूर दि.२५ डिसेंबर बोलोली ता.करवीर
महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकल लोक कलाकार व कलाकार संस्थांना २०२० कोरोना वायरस व लॉकडाउन मुळे लोक कलाकारांना कार्यक्रम नसल्यामुळे प्रत्येक कलाकाराला ५०००/पाच हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत म्हणून जाहीर करण्यात आली होती.पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २८० लोक कलाकार यांना कोरोना मदत ५०००/रुपये प्रमाणे मिळाली आहे.बाकीचे लोक कलाकार फक्त आशेवरच आहेत.

तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद येथे २०१९/२० ते २०२२ या वर्षामध्ये वयवृध्द लोक कलाकारांचे कमेटी नसल्यामुळे काही वर्षांपासूनचे अर्ज व नवीन अर्ज वयवृध्द मांनधनसाठी मोठ्या संख्येने जमा होत आहेत.लोक कलाकार यांना जास्तीत जास्त मदत व लोक कलाकार यांचे कोल्हापूर जिल्हा येथे वयवृध्द लोक कलाकारांची कमेटी स्थापन व्हावी असे सर्वांनी सगळ्याचें मत मांडले आहे

ह्या सर्व लोक कलाकारांचे अपेक्षा व म्हणने पाहून श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे यांनी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकारांचे विषय व अडचणी पाहून कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री माननीय.श्री.दीपक केसरकर साहेब यांना आपण भेटून आपल्या लोक कलाकारांचे मार्ग काढू असे म्हणाले.

माननीय पालकमंत्री दीपक केसरकर साहेब आपल्याला नक्की मदत करतील आणि आपले लोक कलाकारांचे प्रश्न सोडवतील असे ही तानाजी कुऱ्हाडे यांनी आपले मत व्यक्त केले.

या बैठकीला सखाराम भित्तम, एकनाथ पाटील पासार्डेकर,लक्षुमन सावंत, शिवाजी पाटील,भगवान कुंभार,वसंत कांबळे, किरण येडुडकर,श्रीकांत राणे,बाळू चौगुले, बळवंत सुतार, भिकाजी पाटील असे शाहीर व लोक कलाकार उपस्थित होते.

 

Leave a Comment