कोल्हापूर करवीर,वाशी येथे लोक कलाकारांचा मेळावा.

_____________________________________
कोल्हापूर तानाजी कुऱ्हाडे : वाशी ता.करवीर येथे १९ मार्च रोजी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकारांचा श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर लोक कलाकार सांस्कृतिक शिक्षण संगीत संस्था सरवडे यांचे कडून मेळावा घेण्यात आला.

श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे यांनी महाराष्ट्र लोक कलाकार वयोवृद्ध पेन्शन यांच्यासाठी शासनाच्या असणाऱ्या जाचक अटी व नियम हे वय वृद्ध कलावंतांना खर्चीक व दमवण्यासाठी असून आपण सर्वांनी एकत्र यावे. आपल्या सर्वांची एकी हे महत्त्वाचे आहे. तसेच वयोवृद्ध पेन्शन साठी 48 हजाराचा तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला कायमस्वरूपी रद्द व्हावा.

यासाठीही आपण सर्वांनी मिळून शासन व सरकारकडे मागणी करण्याची गरज आहे असे म्हणाले. कोल्हापूर जिल्हा परिषद कलाकार कमिटी स्थापन लवकर व्हावी कारण अनेक वर्षे लोक कलाकार वयवृद्ध अनेकांचे मानधन प्रस्ताव तसेच पडून आहेत. असेही त्यांच्या भाषणातून सांगण्यात व माहिती देण्यात आले. यावेळी तानाजी कुऱ्हाडे यांनी आपण लिहलेली कविता.
आज कलाकारांचा घेतला मेळा,
कुणाचा तरी आहे तिरका डोळा |
प्रत्येक वर्षाला करतो कागद गोळा, कलाकारांच्या कमिटीचा नाही मेळा ||
लोक कलाकारांचा मेळा,
कोणाच्यातरी पोटात गोळा |
त्याचं त्याला माहीत कळा,
का नाही कमिटी गोळा ||
कलाकारांच्यात पण राजकारण,
प्रत्येक वर्षाला आहे काही ना काही कारण |
आपण सर्व आहोत जबाबदार,
लोक कलाकार विश्वासात कारणी,
कलाकारांच्यात पण राजकारणी ||
मी पाहिलेत पत्रिका फेटे व खुर्चीवर रुसणारे,
म्हणून ते आहेत आमच्यावर हसणारे | आमच्यात ही कधीपर्यंत राहणार रूसणारे,
कधी होणार आमच्या लोक कलाकारांचे चेहरे असणारे ||
ही कविता वाचून सर्व लोक कलाकार व मान्यवरांचे मनं जिंकले.
शाहीर शामराव खडके यांनी शासकीय योजना याची माहिती दिले.

सौ.अरुणा कुंभार यांनी लोक कलावंतांच्या व्यथा मांडल्या. सौ.अनिता निकम यांनी लोक कलाकार महिलांनी शासकीय योजना मिळवण्यासाठी जास्तीत जास्त महिला एकत्र येणे महत्त्वाचे आहे असे म्हणाल्या. शाहीर महादेव बुडके यांनी. आपल्या भाषणात स्वतःची शाहीर कला ओळख व स्वतःचे शासन दरबारी होणारी फरफड सांगितले. कोळप्पा धोत्रे सिने अभिनेता व मराठी चित्रपट निर्माते यांनी कोल्हापूर येथील लोक कलाकारांच्या अडीअडचणी व न्यायासाठी आपण स्वतः सर्वांच्या सोबत आहोत असे म्हणाले. राष्ट्रीय शाहीर बाबुराव कांबळे (गटविकास अधिकारी)यांनी कलाकार हा कलाकारच असतो. कलाकारांची ओळख ही कलेतूनच होते हे त्यांच्या असणाऱ्या हलगीच्या वादन तालावर त्यांनी सिद्ध करून दाखवून दिले.

अमर कुंभार(लोकनियुक्त सरपंच नंदवाळ) यांनी लोक कलाकार यांच्यासाठी ग्रामपंचायत व आपल्याकडून जे काय मदत लागेल ते मी व माझ्या सहकार्याकडून मदत करण्याचा प्रयत्न करेन असे म्हणाले.
या लोक कलाकारांच्या मेळाव्यात भगवान कुंभार(शाहीर सुरती व डाक वादक),श्रीकांत राणे येवतीकर, बाळू चौगले(हलगी वादक),बाळू पाटील येवतीकर,शा.यशवंत कांबळे,सुरेश चौगुले,रघुनाथ खालकर,शा.एकनाथ पाटील(बुवा), दिनकर भोईटे,शा.आनंदा पाटील (धामोड),शा.विठ्ठल कांबळे, सखाराम खोत(बंधू सखा), अनिल निकम,ह.भ.प.एस.के.नाळे,ह.भ.प.नानामदेव पाटील,ह.भ.प.आनंदराव वायदंडे, सुनिल शिंदे (बुधवार पेठ कोल्हापूर), विनायक उलपे(पो.पाटील),शा.भिमराव गायकर, पांडुरंग गायकर(ढोलकी वादक),सजाबाई जाधव मंदूर(देवदासी), रामचंद्र जाधव (मर्दानी खेळ), व इतर कलाकार उपस्थित होते.सुत्रसंचालन शा.बाबुराव शंकर कांबळे आभार शा.महादेव बुडके यांनी मानले.

सूर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे
कोल्हापूर

Leave a Comment