. यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,
. कोरोना विषाणु संसर्गा महामारी संकटात राज्य शासनाव्दारे नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन माझे कुटुंब माझी जबाबदारी हे जनजागृतीचे अभीयान सुरू करण्यात आले असुन, याच कार्यक्रमाअंतर्गत कोल्हापुरच्या एका अवलीया धाडसी तरूण युवकाने महामारीच्या महासंकटात आपले जिव धोक्यात घालुन सायकलव्दारे या जनजागृती मोहीम करीत अर्ध्याहुन अधिक महाराष्ट्र पिंजुन काढले असुन , या तरूणाचे यावल तहसीलच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर के पवार आणी महसुलचे मुक्तार तडवी , संतोष पाटील त्यांच्या सहकार्यानी महसुल प्रशासनाच्या वतीने त्याचे स्वागत केले . या संदर्भात कोल्हापुर जिल्ह्यातील या युवका कडुन पत्रकार प्रतिनिधी यांनी त्याच्याकडुन माहीती घेतली असता या तरुणाने आपले नांव नितिन गणपत नावनुरकर वय३९ वर्ष राहणार आंबोळी जिल्हा कोल्हापुर असल्याचे सांगुन आपण १ ऑक्टोबर २०२०पासुन कोरोना संकटातुन आपल्या राज्यातील नागरीक सुरक्षित कसे राहतील याच विषयाला आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीच्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्यात सायकली व्दारे गावागावात फिरून आपण मास्क लावा, सोशल डिस्टींसिंगचे काटेकोर पालनकरा असे बोलुन जनजागृती व्दारे सर्वसामान्या पर्यंतसंदेश पहोचवत आहे . या युवकाने सहा महीन्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुर , सांगली , सातारा , सोलापुर , पुणे , लातुर , अहमदनगर. औरंगाबाद , नागपुर , गडचिरोली ,भंडारा , गोंदीया, वर्धा , अमरावती , अकोला , बुलढाणा , जळगाव , धुळे , नंदुरबार असे २९ जिल्ह्याचे सायकलीव्दारे प्रवास करीत आजवर 13 हजार५०० किलोमिटरचा प्रवास केला आहे .कोरोनाच्या सर्वाधीक गोंधळलेल्या १ ऑक्टोबर २०२०पासुन सुमारे सहा महीन्याच्या वेळेपासुन हा तरूण आपल्या कुटुंबा पासुन केवळ आपल्या राज्यातील नागरीकांना आरोग्याची घेण्याचा विधायक दृष्टीकोण ठेवुन कोरोना विषाणु संसर्गा पासुन सावध करण्यासाठी या जिद्दी तरूणाने जनजागृतीच्या माध्यमातुन केलेल्या समाजकार्याला सलाम.