कोरोना नियम व शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या प्रेमाचा चहा संचालकवर दंडात्मक व पोलीस कारवाई

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहरातच नव्हे तर जिल्ह्यातसुद्धा कोरोनाचे वाढते प्रादुर्भावाने चिंता वाढली असून प्रशासनसुद्धा कडक उपाययोजना करीत आहे.
तालुक्यात महसुल कर्मचारी,पोलिस,शिक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी जीवाची जोखिम पत्करित नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे याहेतुने रस्त्यावर कार्यरत असतांना नागरिक मात्र विनामास्क बेजबाबदारपणे वागत आहेत.
हिंगणघाट शहरातील अनेक नागरिक व व्यापारीसुद्धा वेळप्रसंगी कोरोना नियंत्रण कर्मचाऱ्यांशी वाद घालु लागले आहेत.
दि.१७ मार्च रोजी स्थानिक ‘प्रेमाचा चहा’ या रेस्टॉरेंटच्या संचालकाने नगरपालिकेच्या कोरोना नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालित अर्वाच्य शिविगाळ करीत मारहाण करण्याची धमकी देत त्यांचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न केला.
कोरोना काळात प्रशासनाने सायंकाळी ७ पर्यंत दुकाने व इतर प्रतिष्ठाणे बंद करण्याचा आदेश दिला आहे.या संबंधी जिल्हाधिकारी तसेच स्थानिक उपविभागीय अधिकारी यांचे स्पष्ट आदेश असल्याने पालिकेच्या पथकाने ‘प्रेमाचा चहा’ या रेस्टोरेंटवरती धाड़ मारित दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न केला.यावेळी या रेस्टोरेंटचे संचालक संतोष गौतम (ठाकुर)यांनी उलट पथकातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत अर्वाच्य शिविगाळ केली.
सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश असूनही रात्री ७.४५ वाजता ही ‘प्रेमाची चहा’ सुरुच होती,यावेळी तेथे कोविड-१९ तसेच सोशल डिस्टनसिंग आदेशाचे उल्लंघन करीत १०-१५ ग्राहक हजर होते.
हैंडवाश,सैनिटाइजर तसेच ग्राहक नोंदवहीसुद्धा पथकाला आढळली नसल्याचे पोलिस तक्रारीत म्हांटले आहे.
तुम्ही कोणाचे आदेशाने येथे आले अशी विचारणा केली,वाद वाढतांना दिसुन येताच पथकातील कर्मचाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अनिल जगताप यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधुन ‘चहावाले’ संतोष गौतम उर्फ संतोष ठाकुर यांचा संपर्क करुन दिला.परंतु पूर्वाश्रमीचे पोलिस दलातील शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या संतोष ठाकुर यांनी भ्रमणध्वनीवर बोलतांनासुद्धा उर्मट भाषेचा प्रयोग करीत मुख्याधिऱ्यांचा उपमर्द केला तसेच शासकीय कारवाईत अडथळा निर्माण केला.
सदर प्रकरणी दि.१८ मार्च रोजी मुख्याधिकारी जगताप यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार केली असून कलम १८६,१८८,२७० भादंवी सहकलम ३,४ साथरोग प्रतिबंधक अधिनियम ५१( ब) आपत्ती प्रतिबंधक अधिनियम,महाराष्ट्र कोविड-१९ अधिनियम ११ अन्वये गुन्हा नोंद केला.

Leave a Comment