यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
कोरोना विषाणु संसर्गाच्या अत्यंत धोकादायक अशा संकटकाळात अनेकांनी आपल्या कुटुंबातील कमाविते प्रमुख व्याक्ती गमावले असुन ,तालुक्यातील परसाडे येथील राहणारे भागवत सावळे यांचा देखील कोरोना पॉझीटीव्ह आल्याने उपचारा दरम्यान दुर्देवी मृत्यु झाला असुन , असे असतांना मात्र त्यांच्या कुंटुंबाला तांत्रीक अडचणींच्या गोंधळामुळे शासनाकडुन मिळणाऱ्या मदती पासुन वंचीत राहावे लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . या संदर्भातील वृत्त असे की , यावल तालुक्यातुन २०२१च्या कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटकाळात सुमारे १३०हुन अधिक नागरीकांनी आपला जिव गमावला असुन , परसाडे तालुका यावल येथे राहणारे भागवत सावळे यांचा देखील दिनांक १० / ४ / २o२१ रोजी कोरोना पॉझीटीव्ह आल्याने जळगाव येथील शासकीय कोवीड रुग्णालयात मृत्यु झाला असुन , दरम्यानच्या काळात कोरोनामुळे मरण पावलेल्या व्याक्तीच्या कुटुंबास राज्य शासनाकडून पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली , यावेळी विविध प्रशासकीय यंत्रणेकडुन गाव पातळीपासुन तर शहरी विभागातुन कोरोनामुळे मरण पावलेलेल्यांची संपुर्ण माहीतीसह आकडेवारी काढण्यात आली , यात मात्र परसाडे तालुका यावल येथील रहीवासी भागवत सुपडू सावळे वय५५ वर्ष यांचा देखील या काळात मृत्यु झाला असुन , त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयातुन उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असता त्यांचा दिनांक १o एप्रिल २०२१ रोजी उपचारार्थ दाखल केले असता मृत्यु झाला , मात्र त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयातुन पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आल्याची नोंद नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन मदतीसाठी प्रस्ताव मान्य होईल का नाही याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे . या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ बी बी बारेला यांनी या विषयी माहीती सांगीतले की कोरोना काळात संसर्गामुळे मरण पावलेल्यांची नांव हे पॉर्टल व स्थानिक महसुल प्रशासना यंत्रणेकडुन करण्यात आली त्यामुळे सदरच्या मरण पावलेल्या व्यक्तिची नोंद किंवा तांत्रीक अडचणीमुळे नोंदणी ही उशीरा झाली असावी , मयत भागवत सावळे यांना यावल हुन जळगाव पाठवितांनाच त्यांना तसा दाखला देण्यात आला असेलच असे त्यांनी सांगीतले . या सर्व गोंधळामुळे कोरोना मुळे मरण पावलेल्या मजुर व्याक्तीच्या कुटुंबास शासकीय मदतीपासुन वंचीत राहावे लागणार की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .